एक्स्प्लोर
दिलासादायक... मुंबईत दोन आठवड्यात तर राज्यात 2 महिन्यात कोरोनावर नियंत्रण शक्य, IIT मुंबईचा अहवाल
राज्यात 2 महिन्यात आणि देशाच्या इतर राज्यांमध्ये दोन ते तीन महिन्यांमध्ये कोरोनाची सद्यस्थिती पाहता नियंत्रण मिळवू शकतो असा अंदाज लेविट्स मेट्रिक्स सूत्राचा वापर करुन तयार केलेल्या या अहवालात व्यक्त केला आहे.
मुंबई : कोरोनावर नियंत्रण कधी मिळवणार? असा प्रश्न अनेकांना पडलाय. मात्र या प्रश्नावर आयआयटी मुंबईने एक अहवाल तयार केला असून त्यामधील विश्लेषणानुसार मुंबईत अवघ्या दोन आठवड्यात कोरोनावर नियंत्रण मिळवणं शक्य असल्याच सांगितलंय. तर राज्यात 2 महिन्यात आणि देशाच्या इतर राज्यांमध्ये दोन ते तीन महिन्यांमध्ये कोरोनाची सद्यस्थिती पाहता नियंत्रण मिळवू शकतो असा अंदाज लेविट्स मेट्रिक्स सूत्राचा वापर करुन तयार केलेल्या या अहवालात व्यक्त केला आहे.
मुंबई आयआयटीच्या कम्प्यूटर सायन्स विभागाच्या प्राध्यापक डॉ भास्करण रमण यांनी कोरोनावर नियंत्रणाबाबात हा अहवाल तयार केला आहे. या अहवालात लेविट्स मेट्रिक्स गणितीय सूत्राचा वापर करून ग्राफीकल प्रेझेन्टेशन केलं गेलं आहे. यामध्ये आजच्या कोरोनामुळे मृत्यूची संख्या आणि काल कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येचा वापर या सूत्रात करून कोरोना देशातील राज्यातील भागात कधी नियंत्रणात येणार हे सांगितलं आहे.
मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी या अहवालाबद्दल एबीपी माझा माहिती दिली.आयआयटीच्या अहवालानुसार ज्याप्रकारे मुंबईचा कोरोना रिकव्हरी रेट हा 70 टक्क्यांपर्यंत वाढलेला असताना 2 आठवड्यात मुंबईत कोरोना नियंत्रणात येईल असा सांगण्यात आलं आहे. तर राज्यात 2 महिन्यात आणि देशात अडीच महिन्यात कोरोना नियंत्रण मध्ये येणार आहे, असं त्या म्हणाल्या.
अहवालानुसार कोरोनावर नेमकं नियंत्रण कसं येणार
मुंबईत - 2 आठवड्यात कोरोनावर नियंत्रण
दिल्लीत- अडीच आठवड्यात कोरोनावर नियंत्रण
गुजरात- कोरोनावर नियंत्रण
राज्यात- दोन महिन्यात कोरोनावर नियंत्रण
देशात - अडीच महिण्यात कोरोनावर नियंत्रण
कोरोना नियंत्रणात आला म्हणजे पूर्णपणे संसर्ग कमी झाला असं न समजता मृत्यूदर म्हणजेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या नियंत्रणात आली असं समजण्यात यावं असं या अहवालात सांगितलं आहे. त्यामुळे नियंत्रण जरी या अहवालानुसार मिळवलं तरी कोरोनाच्या बाबतीत गाफील राहून चालणार नाही. तर दुसरीकडे सगळ्यांनी मिळून ठरवलं तर 2 आठवड्यात कोरोनावर नियंत्रण मुंबई मिळवू शकतो, असं जरी महापौर म्हणाल्या असल्या तरी मृत्यूदर कमी करण्याचा मोठं आवाहन अजूनही मुंबईसमोर आहे.
या अहवालानुसार मुंबईत जरी दोन आठवड्यात कोरोना नियंत्रणात आला तरी राज्यात नियंत्रणात यायला 2 महिन्याचा अवधी लागणार आहे. त्यात सुद्धा नियंत्रणमध्ये आला तरी कोरोनापासून आपला भाग मुक्त झाला किंवा कोरोनापासून आपण कायमचे सुटलो असं न समजता कोरोनाशी लढताना प्रशासनाला साथ देण्याची गरज आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement