एक्स्प्लोर

Vidhan Parishad Election 2021 : अकोल्यातील पराभव शिवसेनेच्या जिव्हारी, पक्षाशी गद्दारी करणारा सुर्याजी पिसाळ कोण..?

विधान परीषदेचे विद्यमान आमदार असूनही गोपीकिशन बाजोरिया यांचा झालेला पराभव, शिवसेनेनं गांभीर्याने घेत पक्षांतर्गत चौकशी सुरू केली आहे.

Maharashtra Vidhan Parishad Election 2021 : विधान परिषदेच्या अकोला, वाशिम आणि बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरीया यांचा १०९ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत भाजप उमेदवार वसंत खंडेलवाल यांचा विजय झाला. परंतु, हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. पराभवास कोण कारणीभूत आहे याची पक्षांतर्गत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 

विधान परिषदेचे विद्यमान आमदार असूनही गोपीकिशन बाजोरिया यांचा झालेला पराभव, शिवसेनेनं गांभीर्याने घेत पक्षांतर्गत चौकशी सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोपीकिशन बाजोरीया यांच्या पराभवास स्थानिक आमदार, जिल्हाप्रमूख आणि स्थानिक खासदार जबाबदार असल्याचं दबक्या आवाजात बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेत पक्षांतर्गत संशयकल्लोळ सुरू झाला असून पक्षाशी गद्दारी करणारा सुर्याजी पिसाळ कोण? याची चर्चा शिवसेनेत सुरू असल्याची माहिती मिळत आहे. लवकरच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या संदर्भात बैठक घेऊन पक्षांतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात वसंत खंडेलवाल यांना 443 मते मिळाली. तर, शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना 334 मते मिळाली. महाविकास आघाडीची जवळपास 80 मते फुटली असल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय 31 मते अवैध ठरली. 

अकोला महापालिकेसह अनेक नगरपरिषदांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपने ही निवडणूक सर्व ताकदिने लढवली होती. अकोल्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि नितीन गडकरींचे कट्टर समर्थक वसंत खंडेलवाल यांच्या विजयासाठी भाजपने प्रयत्न केले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. 

शिवसेनेला धक्का

हा मतदारसंघ 1998 पासून गेली चार टर्म शिवसेनेच्या ताब्यात होता. विशेष म्हणजे या चारही निवडणुकीत शिवसेनेकडे मतदारांचं बहुमत नसतांनाही त्यांनी विजयाचा 'चमत्कार' घडवून आणला आहे. 1998 मध्ये शिवसेनेचे राजेंद्र पाटणी या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर 2004 पासून शिवसेनेकडून गोपीकिशन बाजोरिया सलग तीनवेळा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. बाजोरिया सध्या विधान परिषदेत पक्षाचे मुख्य प्रतोद आहेत. त्यामुळे त्यांच्या पराभवामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर  2024: ABP MajhaPM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवादTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  1 PM : 16 नोव्हेंबर  2024: ABP MajhaJayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
×
Embed widget