राहायला घर नाही अन् सरकार म्हणतेय हर घर तिरंगा, उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : हर घर तिरगां हा केंद्र सरकारने एक कार्यक्रम आणलाय, पण यावरच सध्या एक व्यंगचित्र व्हायरल होतेय. घराचा नाही पत्ता, 75 वर्ष झालेली आहेत. ज्यांच्याकडे घरच नाही ते तिरंगा लावणार कुठे? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
Uddhav Thackeray : हर घर तिरगां हा केंद्र सरकारने एक कार्यक्रम आणलाय, पण यावरच सध्या एक व्यंगचित्र व्हायरल होतेय. घराचा नाही पत्ता, 75 वर्ष झालेली आहेत. ज्यांच्याकडे घरच नाही ते तिरंगा लावणार कुठे? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
फक्त तिरंगा फडकवला म्हणजे आपण देशभक्त झालो का? काहींना भारतमाता आपलीच मालमत्ता वाटतं. असे म्हणत यावेळी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेलं व्यंगचित्र दाखवून भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.. देशाला स्वातंत्र मिळून 75 वर्ष झाले. पण आपण नेमकं कुठे आहोत. आपल्या देशातील लोकशाही किती काळ जिवंत राहणार आहे? कशी जिवंत राहणार आहे? याचा आपण विचार केला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
परवा देशाचा अमृत महोत्सव. कार्टुन कंबाईन्सने 1947 पासून व्यंगचित्र प्रकाशित करावी अशी इच्छा. मी शिवसेनाप्रमुखांच्या व्यंगचित्रांचे पुस्तक काढू शकलो याचा आनंद. सगळ बदलत पण परिस्थिती तीच आहे. देशाचा स्वातंत्र्याचा वर्धापन दिन बाळासाहेबांचे 1980 सालचे व्यंगचित्र दाखवले. अस्वस्थ मनाची व्यथा व्यंगचित्र मांडतो. 1978 सालचे अजून एक व्यंगचित्र, तो काळ भोगलेल्या पिढीला ते जाणवेल. मोरारजींची हेकडी वृत्ती दर्शवणारे ते व्यंगचित्र. आज सगळ्यांनी लोकशाही टिकेल का? मार्मिक केवळ साप्ताहिकाचे नाव नाही तर व्यंगचित्रे सुध्दा मार्मिक. नुकतेच प्रकाशित झालेले एक व्यंगचित्र समोर आले. यामध्ये तिरंगा आहे पण घर नाही आणि सरकार म्हणते घर घर तिरंगा. हा मार्मिकपणा आहे असे व्यंगचित्र काढणारे आजही आहेत.
आता आपण परत गुलामगिरीकडे चाललो का? प्रत्येक माणसाचे मत एकच असेल असे नाही. परंतु आठ दहा दिवसापूंर्वी नड्डांनी जे वक्तव्य केले ते लोकशाहीला घातक आहे. एकच पक्ष टिकणार, इतर पक्ष संपणार. त्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या नावात किती कुळ मला माहित नाही पण किती कुळ आली तरी शिवसेना संपणार नाही. सगळे मिळून संघराज्य पद्धत संपवायला निघालेत का? प्रादेशिक पक्ष संपवायचे हे नड्डांचे मत आहे का? अमृत महोत्सव अमृतासारखा असायला हवा. सध्या सोशल मिडियाचा जमाना पण ते सोसल का? लष्करात कपात करण्याची बातमी धोकादायक आहे. लष्कर प्रचंड असायलाच हवे. चीन अमेरिका यांनी आधुनिकीकरण साठी सैन्य कपात केल्याचे ऐकिवात नाही. सरकार पाडायला पैसे आहेत पण लष्करासाठी नाही. नुसता तिरंगा लावून चीन परत जाणार का? घरावर तिरंगा हा लषकराला वाटायला हवे आम्ही सोबत आहोत. मला आज राजकीय बोलायचे नाही. पण महाराष्ट्रात आपत्ती असतांना सरकारचा पत्ता नाही मंत्र्यांचा पत्ता नाही मौज मजा सुरु आहे.