संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र, महत्वाच्या विषयाकडे वेधलं लक्ष
मुंबई : शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलं आहे.
मुंबई : शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलं आहे. राज्यातील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत डीएनए (DNA) टेस्टिंगसाठी लागणाऱ्या किट्स उपलब्ध नसल्याची तक्रार, संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पत्राद्वारे केलेय. संजय राऊत यांनी ट्वीट करत पत्राची प्रत पोस्ट केली आहे. राज्यात डीएनए टेस्टिंगसाठी लागणाऱ्या किट्स उपलब्ध नाहीत, असे राऊतांनी म्हटलेय. संजय राऊतांच्या पत्राला देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार? याकडे सर्वांचं लक्ष वेधलेय. काही गंभीर तसेच संवेदनशील गुन्ह्यांतील हायप्रोफाईल आरोपींना अप्रत्यक्ष मदत व्हावी म्हणून हा तुटवडा निर्माण करणे व त्यातून पुरावे नष्ट करण्याची ही योजना असल्याचे बोलले जाते, असे संजय राऊतांनी आपल्या पत्रात म्हटलेय.
प्रयोगशाळेतील DNA चा अहवाल हा विवादित पितृत्व चाचणी, खून, बलात्कार, POCSO कायदा इत्यादींमध्ये महत्त्वाचा पुरावा म्हणून न्यायालयात ग्राह्य धरला जातो. परंतु एप्रिल 2023 पासून DNA साठी लागणारे किट्स बहुतेक सर्व प्रयोगशाळेत उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्या विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे, असे पत्रात संजय राऊतांनी म्हटलेय. त्याशिवाय अनेक गुन्ह्यांच्या तपासामध्ये विलंब होत आहे. तपासामध्ये जप्त केलेला मुद्देमाल खराब होऊन त्यांचा गुन्हा सिध्दतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असेही राऊतांनी आपल्या पत्रात म्हटलेय.
मा. देवेंद्र जी..
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 31, 2023
जय महाराष्ट्र!@Dev_Fadnavis
@ pic.twitter.com/Jt0HEsc0tx
संजय राऊतांचं पत्र जशाच्या तसं....
मा. श्री. देवेंद्र फडणवीसजी,
जय महाराष्ट्र!
एका गंभीर विषयाकडे आपले लक्ष वेधीत आहे.
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय ही महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाच्या अखत्यारीत असलेली संस्था न्यायदानाच्या प्रक्रियेत एक महत्त्वाची भूमिका बजावत असते. या प्रयोगशाळेतील DNA चा अहवाल हा विवादित पितृत्व चाचणी, खून, बलात्कार, POCSO कायदा इत्यादींमध्ये महत्त्वाचा पुरावा म्हणून न्यायालयात ग्राह्य धरला जातो. परंतु एप्रिल 2023 पासून DNA साठी लागणारे किट्स बहुतेक सर्व प्रयोगशाळेत उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्या विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे, अशी माझी माहिती आहे.
काही गंभीर तसेच संवेदनशील गुन्ह्यांतील हायप्रोफाईल आरोपींना अप्रत्यक्ष मदत व्हावी म्हणून हा तुटवडा निर्माण करणे व त्यातून पुरावे नष्ट करण्याची ही योजना असल्याचे बोलले जाते. ही अत्यंत गंभीर बाब आहे. परिणामी अनेक गुन्ह्यांच्या तपासामध्ये विलंब होत आहे. तपासामध्ये जप्त केलेला मुद्देमाल खराब होऊन त्यांचा गुन्हा सिध्दतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. या संचालनालयाला पूर्ण वेळ महासंचालक, न्यायिक व तांत्रिक तसेच संचालक असूनदेखील या गंभीर विषयाकडे लक्ष नसल्याचे दिसून येते. तरी कृपया या तक्रारीची दखल घेऊन यामध्ये दोषी असणारे अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी.