एक्स्प्लोर

वैभव नाईकांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी, शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चेमुळे घेतला निर्णय?

Vaibhav Naik : ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केल्यानंतर विरोधकांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केलीय.

सिंधुदुर्ग : ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक ( Vaibhav Naik) यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून (Sindhudurg District Chief) उचलबांगडी करण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत यांनी वैभव नाईक यांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केली आहे. वैभव नाईक यांच्या उचलबांगडीनंतर सिंधुदुर्गात तीन जिल्हाप्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये संदेश पारकर, सतीश सावंत आणि संजय पडते यांचा समावेश आहे. आमदार वैभव नाईक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा असल्याने जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंतु, आपल्याकडे पक्षवाढीचं काम दिल्यामुळे जिल्हाप्रमुख पद दुसऱ्या व्यक्तीकडे देण्यात आल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले आहे. 

वैभव नाईक यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केल्यानंतर विरोधकांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केलीय. " नव्याने नियुक्त केलेले तिन्ही जिल्हाप्रमुख आधीचे राणे समर्थक असून ठाकरे गटाकडे निष्ठावंतांना डावलून राणे समर्थकाना दिली जातात, अशी टीका केली जात आहे.   

येत्या दोन महिन्यात नारायण राणेंच मंत्रिपद जाणार : आमदार वैभव नाईक 

आमदार वैभव नाईक यांनी आज सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी येत्या दोन महिन्यात नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार असल्याचा गौप्यस्फोट केलाय. "आतापर्यंत इतर राजकीय पक्षांचं अस्तित्व ठरविणाऱ्या नारायण राणेंच राजकीय अस्तित्व आता भाजप ठरविणार आहे. भाजपला राणेंची राजकीय दृष्टया गरज नाही, त्यामुळे राणेंना राजीनामा द्यावा लागणार आहे, असा हल्लाबोल वैभव नाईक यांनी केलाय. 

"नितेश राणे यांनी आपल्या वडिलांना विचारावं की इडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी पक्ष का बदलला? त्यांना आलेल्या ईडीच्या नोटीसचं काय झालं. वडिलांनी नेमका कोणता समजोता केला? हे अगोदर जनतेसमोर आणावं आणि मग इतरांना उपदेश करावा, असे वैभव नाईक यांनी म्हटलं आहे. दीपक केसरकर यांना निवडून आणू या नितेश राणे यांच्या वक्तव्याचाही वैभव नाईक यांनी समाचार घेतला. "नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे हे दीपक केसरकर यांना ड्रायवर ठेवणार असल्याचे सांगतात तर नितेश राणे  केसरकरांना निवडून आणणार असे सांगतात. या दोन्ही बंधूंनी एकत्र बसून आपल्या वडिलांना विचारावं की आपण केसरकरांचं काय करूया? असा हल्लाबोल वैभव नाईक यांनी यावेळी केला.  

महत्वाच्या बातम्या 

धुळ्याच्या क्षितिजने केले जी 20 च्या युवा परिषदेला संबोधित,  युवा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रातर्फे निवड

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे 2026 रोजी मतदान; निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर
Live Blog Updates: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे 2026 रोजी मतदान; निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी सोलापूरच्या नेत्यांच्या जोर बैठका, राजेंद्र राऊत, राजन पाटील, राम सातपुते यांची चढाओढ
विधान परिषदेसाठी सोलापूरच्या नेत्यांच्या जोर बैठका, राजेंद्र राऊत, राजन पाटील, राम सातपुते यांची चढाओढ
Sahar Shaikh Mumbra AIMIM: कैसा हराया...सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात येताच नॉट रिचेबल; वडीलही गायब, फोनही घेईनात, नेमकं प्रकरण काय?
कैसा हराया...सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात येताच नॉट रिचेबल; वडीलही गायब, फोनही घेईनात, नेमकं प्रकरण काय?
Rohit Pawar: सुनेत्रा काकींचा प्रचार, पण निशाण्यावर भाजप! बारामतीत घडामोडींना वेग, रोहित पवारांची टीका, चंद्रकांत पाटलांनीही दिलं उत्तर
सुनेत्रा काकींचा प्रचार, पण निशाण्यावर भाजप! बारामतीत घडामोडींना वेग, रोहित पवारांची टीका, चंद्रकांत पाटलांनीही दिलं उत्तर

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara News: महाराष्ट्रातील पहिलं जनावरांचं ‘ब्युटी पार्लर’; मान्याची वाडीच्या भन्नाट उपक्रमाची चर्चा, राज्यभरातील गावांसाठी प्रेरणादायी कहाणी
महाराष्ट्रातील पहिलं जनावरांचं ‘ब्युटी पार्लर’; मान्याची वाडीच्या भन्नाट उपक्रमाची चर्चा, राज्यभरातील गावांसाठी प्रेरणादायी कहाणी
Nashik News: नाशिक धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, रणरणत्या उन्हात रणरागिणींची बाईक रॅली, PHOTO
नाशिक धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, रणरणत्या उन्हात रणरागिणींची बाईक रॅली, PHOTO
आयपीएलमधील 'डोसा-इडली-सांबर-चटणी' गाण्यावरून चेन्नईचा संताप; थेट बीसीसीआयकडे तक्रार, प्रकरण नेमकं काय?
आयपीएलमधील 'डोसा-इडली-सांबर-चटणी' गाण्यावरून चेन्नईचा संताप; थेट बीसीसीआयकडे तक्रार, प्रकरण नेमकं काय?
Rohit Pawar: सुनेत्रा काकींचा प्रचार, पण निशाण्यावर भाजप! बारामतीत घडामोडींना वेग, रोहित पवारांची टीका, चंद्रकांत पाटलांनीही दिलं उत्तर
सुनेत्रा काकींचा प्रचार, पण निशाण्यावर भाजप! बारामतीत घडामोडींना वेग, रोहित पवारांची टीका, चंद्रकांत पाटलांनीही दिलं उत्तर
तमिळनाडू आणि यूपीमधील खासदारांचा फरक 40 वरून 61 वर, निवडणूक आणि मतदारसंघ पुनर्रचना आयोग सुद्धा यांच्या खिशात, जसा हवा तसा बदल करतील; कपिल सिब्बलांनी दक्षिण विरुद्ध उत्तर भारताचा धोका मांडला
तमिळनाडू आणि यूपीमधील खासदारांचा फरक 40 वरून 61 वर, निवडणूक आणि मतदारसंघ पुनर्रचना आयोग सुद्धा यांच्या खिशात, जसा हवा तसा बदल करतील; कपिल सिब्बलांनी दक्षिण विरुद्ध उत्तर भारताचा धोका मांडला
131st Constitutional Amendment Bill: लोकसभेतील संख्याबळाचा खेळ! 131 वे घटनादुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी केंद्र सरकारला दोन-तृतीयांश मतांची गरज; अधिकची आवश्यक 67 मते कुठून येणार? कोणाचे किती खासदार?
लोकसभेतील संख्याबळाचा खेळ! 131 वे घटनादुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी केंद्र सरकारला दोन-तृतीयांश मतांची गरज; अधिकची आवश्यक 67 मते कुठून येणार? कोणाचे किती खासदार?
महिला आरक्षण सुधारणा विधेयक आज संसदेत सादर होणार; मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाविरोधात विरोधकांचा एल्गार, तामिळनाडूत सीएम स्टॅलिन यांनी काळा कायदा म्हणत प्रती जाळल्या
महिला आरक्षण सुधारणा विधेयक आज संसदेत सादर होणार; मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाविरोधात विरोधकांचा एल्गार, तामिळनाडूत सीएम स्टॅलिन यांनी काळा कायदा म्हणत प्रती जाळल्या
Iran War LIve Update: असीम मुनीर अमेरिकेचा सांगावा घेऊन थेट इराणला, पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीची पुन्हा धडपड; गेल्या 24 तासात कलाटणी देणाऱ्या 5 मोठ्या घडामोडी, 21 एप्रिलपूर्वी काय घडणार?
असीम मुनीर अमेरिकेचा सांगावा घेऊन थेट इराणला, पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीची पुन्हा धडपड; गेल्या 24 तासात कलाटणी देणाऱ्या 5 मोठ्या घडामोडी, 21 एप्रिलपूर्वी काय घडणार?
Embed widget