एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली, त्यांच्याविरोधात हक्कभंग आणणार, बीड आणि परभणी प्रकरणावरुन नाना पटोलेंचा हल्लाबोल 

परभणी आणि बीड या दोन्ही घटनेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलले असल्.याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

Nana Patole on CM Devendra Fadnavis  : परभणी आणि बीड या दोन्ही घटनेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) हे खोटं बोलले असल्.याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणि परभणीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेची दिशाभूल केली आहे. पोलिसांना आणि आरोपीला वाचवण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केल्याचं स्पष्ट झाल्याचे पटोले म्हणाले. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध आम्ही हक्कभंग आणणार असल्याचे नाना पटोले म्हणाले. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि परभणीच्या प्रकरणात ह्या दोन्ही घटना आम्ही विधानसभेमध्ये लावून धरल्या आहेत. दोन्ही घटनेमध्ये मुख्यमंत्र्यांनी ज्या पध्दतीने  खोटारडेपणा केला, तो स्पष्ट झाला आहे. त्यामुळं आम्ही दोन्ही घटनेमध्ये मुख्यमंत्र्याच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचे पटोले म्हणाले. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर, त्या शवविच्छेदनाच्या रिपोर्टचे पहिले पान सर्वांनी पाहिले आहे. या रिपोर्टनुसार सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार असल्याचे फडणवीस म्हणाले होते. याबाबत बोलताना पटोले यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री खोटं बोलले आहेत. त्यांनी विधानसभेची दिशाभूल केली आहे असे पटोले म्हणाले. 

राहुल गांधी लोकसभेत सरकारचं पितळ उघडं पाडतील

इथे भेट घेतल्यानंतर राहुल गांधी लोकसभेत सुद्धा भूमिका मांडतील आणि सरकारचं पितळ उघड करतील असे पटोले म्हणाले. ठरवून मागासवर्गीयांना आणि बौद्धांना आणि अल्पसंख्यांक यांना टार्गेट करण्याचं काम भाजप करत आहे. हे सर्व या ठिकाणी दिसलं आहे. या सर्व गोष्टींचा आवाज लोकशाही पद्धतीने काँग्रेस प्रत्येक ठिकाणी उचलेल असेही पटोले म्हणाले. मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी काँग्रेस पूर्णपणे आहे. ज्यांनी सोमनाथ यांची हत्या केली आहे, त्या आरोपीला सोडलं जाणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असा प्रयत्न काँग्रेसच्या वतीने केला जाणार आहे.  

 मंत्रिमंडळामध्ये 65 टक्के मंत्री हे गुन्हेगार प्रवृत्तीचे 

परभणी आणि बीड या दोन्ही घटनेमध्ये मुख्यमंत्री खोटं बोललेले आहेत. त्यांनी विधानसभेची दिशाभूल केली आहे. ते खोटं बोलले आहेत. पोलिसांना आणि आरोपीला वाचवण्याचं काम त्यांनी केलं आहे. ते स्पष्ट झालेलं आहे. संतोष देशमुखच्या प्रकरणात आणि परभणीच्या प्रकरणात या दोन्ही घटना आम्ही विधानसभेमध्ये लावून धरल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा स्पष्ट झाला आहे. त्यामुळं आम्ही या दोन्ही घटनेमध्ये मुख्यमंत्र्याच्या विरोधात प्री व्हिलेज पोझिशन आणू असे पटोले म्हणाले. दरम्यान, मंत्रिमंडळामध्ये 65 टक्के मंत्री हे गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळं हे गुन्हेगारांचे सरकार निर्माण झालेलं आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सुरक्षित नाही असे पटोले म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Embed widget