Shiv Sena Supreme Court : बहुमत चाचणीच्या राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात राज्यपालांच्या निर्देशाविरोधात याचिका दाखल केली आहे.
Maharashtra Floor Test: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान राज्यपालांच्या या आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात राज्यपालांच्या निर्देशाविरोधात याचिका दाखल केली आहे.
Shiv Sena chief whip Sunil Prabhu moves Supreme Court challenging the Governor’s direction to CM Uddhav Thackeray to conduct a floor test to prove majority support for MVA government in the Assembly by 5 pm tomorrow. #MaharashtraPolitcalCrisis #MahaVikasAghadi #UddhavThackeray pic.twitter.com/RofYWMzzMS
— Bar & Bench (@barandbench) June 29, 2022
ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांनी राज्यपालांच्या फ्लोअर टेस्टच्या निर्देशाविरुद्ध शिवसेनेच्या मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या वतीनं युक्तीवाद करतील.
महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा नववा दिवस आहे. मंगळवारी, भाजपच्या गोटातून मोठ्या घडामोडी घडल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली भाजप श्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर रात्री मुंबईत राज्यपालांची त्यांनी भेट घेतली. सरकारने बहुमत गमावले असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर आज राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी पत्र देत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या