(Source: ECI/ABP News/ABP Majha)
2003 मध्ये शिंदेंबाबत आमच्याकडून चूक झाली अन्... विनायक राऊतांनी सांगितला 'तो' किस्सा
Vinayak Raut ON Eknath Shinde : शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा आजपासून सुरू झाली आहे. याची सुरूवात आज ठाण्यातील टेंभी नाका येथून झाली. टेंभी नाका येथील महाप्रबोधन यात्रेत शिवसेचे नेते भास्कर जाधव, विनायक राऊत आणि सुषमा अंधारे यांनी सभेला संबोधीत केले.
मुंबई : 2003 साली आमच्याकडून चूक झाली. सतीश प्रधान यांना त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी एबी फॉर्म दिला होता, पण दुसऱ्या दिवशी तो फॉर्म एकनाथ शिंदेंना दिला. परंतु, आज त्यांनीच गद्दारीची बीजे रोवली, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेत ते बोलत होते.
शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा आजपासून सुरू झाली आहे. याची सुरूवात आज ठाण्यातील टेंभी नाका येथून झाली. टेंभी नाका येथील महाप्रबोधन यात्रेत शिवसेचे नेते भास्कर जाधव, विनायक राऊत आणि सुषमा अंधारे यांनी सभेला संबोधीत केले. यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदाल हल्लाबोल केला. 2003 साली जी चूक केली ती चूक दुरुस्त करण्याची संधी आपल्याला आहे असं विनायक राऊत म्हणाले. पुढे बोलताना विनायक राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला, त्यावेळी हे गुवाहाटी येथे दारू पिऊन नाचत होते. बीकेसीवर ज्या थोर पुरुषाचे भाषण झाले त्याचे भाषण ऐकून मंत्री झोपले होते.
विनायक राऊत यांनी यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर देखील हल्लोबोल केला. शिवसेना स्थापना झाली त्यावेळी तुम्ही काय करत होता? आपली उंची किती? आपण बोलतो किती? अशी टीका राऊत यांन राणे यांच्यावर केलीय. राऊत म्हणाले, राजन केदार आणि बिर्जे ताई आम्हाला तुमचा अभिमान आहे. गुरूचा बाजार नाही केला, प्रमोशन केलं नाही.
महत्वाच्या बातम्या