पुतण्यावर आरोप, काकी मैदानात; संजय राऊत म्हणतात, आम्ही आभारी आहोत
आमदार अपात्रता सुनावणी लांबणीवर जाईल, पक्षांतराबाबत अध्यक्षांना चीड आहे असं वाटतं नाही, असे खासदार संजय राऊत म्हणाले.
नवी दिल्ली: दिशा सॅलियन (Disha Salian) मृत्यूप्रकरणाची एसआयटी (SIT) चौकशी होणार आहे. याबाबत आमदार नितेश राणेंकडून (Nitesh Rane) सातत्याने आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) आरोप केले जात आहेत. आदित्य ठाकरेंवरील आरोपावर बोलताना शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी आदित्य असं काही करेल असं मला वाटत नाही. चौकशी तर कोणीही लावेल, अशी प्रतिक्रिया दिली होती,त्यानंतर आज खासदार संजय राऊतांनी शर्मिला ठाकरेंचे आभार मानले आहेत. तसेच आमदार अपात्रता सुनावणी लांबणीवर जाईल, पक्षांतराबाबत अध्यक्षांना चीड आहे असं वाटतं नाही, असे देखील राऊत म्हणाले.
आदित्यवर सगळ्यांचा विश्वास आहे. आम्ही आभारी आहोत. भाजपला मदत झाली, असे संजय राऊत म्हणाले. मनसे लोकसभा निवडणूक तयारीवर बोलताना संजय राऊत म्हणाले. भाजपला मदत झाली पाहिजे यासाठी एमआयएम, काही आघाड्या फक्त हुकूमशाही विरोधात शिव्या देतात. पण प्रत्यक्ष भूमिका घेत नाहीत.
लोकशाहीचे रक्षण करणं हा इंडिया आघाडीचा मुख्य अजेंडा: राऊत
इंडिया आघाडीच्या सर्व घटपक्षांना काँग्रेस अध्यक्षांनी निमंत्रण दिले आहे . नितिन कुमारांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे दिल्लीत येणार आहेत. यावेळी त्यांच्या काही गाठीभेटी आहे . अरविंद केजरीवाल यांची बैठकीआधी भेट घेणार आहे. सर्व प्रमुख पक्ष इंडीया आघाडीच्या बैठकीसाठी येतील. उद्याच्या बैठकीत नुसतीच चर्चाच नाही तर निर्णय देखील घेतले जातील. लोकशाहीचे रक्षण करणं हाच मुख्य अजेंडा आहे. संभाजी राजे यांनी बोलवलेल्या बैठकीसाठी आम्ही सकारात्मक आहे. जर वेळ काढता आला तर मी स्वत: किंवा शिवसेनेचे वरिष्ठ नेते या बैठकीला जातील, असे राऊत म्हणाले.
जातीजातीत भांडणं लागू नयेत ही शिवसेनेची भूमिका : राऊत
छगन भुजबळांनी केलेल्या टीकेवर संजय राऊत म्हणाले,अशी भाषा कोणी वापरू नये. जातीजातीत भांडणं लागू नयेत ही शिवसेनेची भूमिका आहे.
देवेंद्र फडणवीसांना विपश्यना करण्याची गरज : राऊत
देवेंद्र फडणवीस यांना सध्या विपश्यना करण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीस यांना दोन ज्युनियरच्या हाताखाली काम करावं लागतंय. त्यामुळे त्यांना विस्मरण झालंय, असेही संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा :
पुतण्यावर आरोप, काकी मैदानात, आदित्य असं काही करु शकेल वाटत नाही, शर्मिला ठाकरेंकडून पाठराखण!