(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राजकारणात मागचं विसरुन पुढं जायचं, खडसेंच्या प्रवेशावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेशावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात मागचं विसरून पुढं जायचं असतं. एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत, असं राऊत म्हणाले.
मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेशावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसेंच्या प्रवेशाबाबत तुमचा दृष्टिकोन काय आहे असा सवाल केला असता संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा खडसेंकडे बघण्याचा जो दृष्टीकोन आहे. त्याकडे आम्ही बघतोय. राजकारणात मागचं विसरून पुढं जायचं असतं. एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. अनेक वर्ष त्यांनी राज्याच्या राजकारणात काम केलं आहे. हा जो काही मामला आहे तो राष्ट्रवादी आणि भाजपचा आहे, असं राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले की, भाजप मोठा पक्ष आहे, खडसेंवर जो अन्याय झाला तो त्यांनी वरिष्ठांना कळवला आहे. राजकारणात गळती लागत असते. शिवसेना, राष्ट्रवादीतील अनेक नेते सोडून गेले आहेत. त्यामुळे अशा गोष्टी होत असतात, असं ते म्हणाले. ट्रेलर झालाय आता फिक्चर बाकी आहे का? असा सवाल केला असता दसरा मेळाव्यावर लक्ष ठेवा असं सूचक वक्तव्य संजय राऊतांनी केलं.
... म्हणून राष्ट्रवादीतच जाण्याचा निर्णय घेतला, एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण
संजय राऊत म्हणाले की, भाजपमध्ये बहुसंख्य लोक आहेत ते भाजपचे नाहीत. भाजपचं कॉंग्रेसीकरण होत चाललंय. एकनाथ खडसे हे आरएसएस विचारांचे आहेत त्यामुळे मला आश्चर्य वाटतं, असंही ते म्हणाले. ते म्हणाले की, भाजपमध्ये अस्वस्थता आहे. हे सरकार पाच वर्षे चालणार आहे. कोणीही कितीही फडफडलं, तरीही काहीही होणार नाही . अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. पण हे पाप आम्हाला करायचं नाहीय, असं ते म्हणाले.
नाराजांना महाविकास आघाडीत स्थान आहे? असं विचारल्यावर महाविकास आघाडीचे दरवाजे खुले आहेत, असं ते म्हणाले.
खडसेंच्या कृषी मंत्री पदासाठी कोणतीही प्रस्ताव आलेला नाही, असंही राऊतांनी सांगितलं. पंकजा मुंडेंना सेनेची ऑफर आहे का? यावर बोलताना ते म्हणाले की, गोपीनाथ मुंडेंशी कौटुंबिक संबंध आहेत. जसा खडसेंनी निर्णय घेतलाय तसा अन्य कोणी निर्णय घेतलाय माहित नाही. कारण हे व्यक्तिगत निर्णय असतात, असं राऊत म्हणाले.
'जीवन उद्ध्वस्त करण्याचा फडणवीसांकडून प्रयत्न', भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एकनाथ खडसे भावूक
महत्त्वाच्या बातम्या :- एकनाथ खडसेंकडून मोदींवर टीका करणारं रिट्वीट तासाभरातच डिलीट
- मोदींवर टीका करणारं जयंत पाटील यांचं ट्वीट एकनाथ खडसेंकडून रिट्वीट
- राष्ट्रवादी प्रवेशावर एकनाथ खडसे म्हणाले, 'माझ्या प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच'
- नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार, समर्थक उदेसिंग पाडवी यांचा दावा
- उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?
- थोबाडीत मारा पण सारखं त्या दांडक्यांसमोर जाऊ नका, चंद्रकांत पाटलांची एकनाथ खडसेंना भावनिक साद
- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाबाबतच्या चर्चांवर एकनाथ खडसे म्हणतात...