एक्स्प्लोर

महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तर गाठ शिवसेनेशी : धैर्यशील माने

जालियनवाला बाग हत्याकांडासारख्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घालण्याचे जर कोणी बोलत असेल तर अजिबात खपवून घेतलं जाणार नाही, स्वातंत्र्यानंतर जर अशी भाषा कोणी करत असेल तर वेळ आणि स्थळ सांगा, असे थेट आव्हान शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटक नवनिर्माण सेनेला दिलं आहे.

कोल्हापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीमधील एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर गाठ शिवसेनेशी आहे. असा इशारा शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटक नवनिर्माण सेनेला दिला आहे. तसेच, या मुद्द्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन पुढील भूमिका ठरवणार असल्याचंही धैर्यशील मानेंनी म्हटलं आहे. तसेच या विकृत संघटनेवर बंदीची घालण्याचीही मागणी धैर्यशील माने यांनी केली आहे. याबाबत त्यांनी एक फेसबुकवर पोस्टही लिहिली आहे. जालियनवाला बाग हत्याकांडासारख्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घालण्याचे जर कोणी बोलत असेल तर अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. हे अत्यंत लज्जास्पद वक्तव्य आहे. स्वातंत्र्यानंतर जर अशी भाषा कोणी करत असेल तर वेळ आणि स्थळ सांगा, असे थेट आव्हान शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटक नवनिर्माण सेनेला दिलं आहे. शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी फेसबुकवर पोस्ट करत थेट कर्नाटक नवनिर्माण सेनेला आव्हान दिलं आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'गेल्या 64 वर्षांपासून महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी कायदेशीररीत्या आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात बेजबाबदार, बेताल वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटील यांना मी सांगू इच्छितो" कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा, पाहूया तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसं, याचे उदाहरण घालून देऊ". आजवर महाराष्ट्राच्या एकिकरणासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलेले आहे. भीमाशंकर पाटील यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी तसे सांगावे, आजही महाराष्ट्राच्या एकिकरणासाठी निधड्या छातीने गोळ्या झेलायला लाखो उभे राहतील पण कर्नाटकातील वंचितांना महाराष्ट्रात आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत हे ध्यानात ठेवावे. अशा बेजबाबदार विधानांनी शांतता भंग करू नये. अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल. अज्ञानातून केलेल्या या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो.' पाहा व्हिडीओ : शिवसेना खासदार धैर्यशिल मानेंचा कर्नाटक नवनिर्माण सेनेला इशारा काय म्हणाले भीमाशंकर पाटील? चौसष्ट वर्षांपासून सीमाभागातील सरकारी मालमत्तेचे आणि कन्नड जनतेच्या मालमत्तेचे महाराष्ट्र एकीकरण समिती नुकसान करत आहे. कन्नडिग जनतेच्या डोळ्यात कुसळा प्रमाणे टोचत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला, त्याला माझा पाठिंबा आहे असे बेदरकार वक्तव्य भीमाशंकर पाटील याने पत्रकार परिषदेत केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वाद : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील सीमा वाद मागील कित्येक वर्षांपासून सुरु आहे. बेळगाव-कारवार-निपाणी तसेच परिसरातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्र राज्यात समाविष्ट होण्यासाठी आतूर आहे. कर्नाटक राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापन झाले तरी सीमा भागातील मराठी भाषिक जनतेवर कानडी भाषा शिकण्याची सक्ती केली जाते. काही वर्षांपूर्वी बेळगावचे नाव देखील तेथील सरकारने बदलले होते. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कर्नाटक सरकारमध्ये या ना त्या कारणावरुन वाद सुरु असतात. संबंधित बातम्या :  महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला : कर्नाटक नवनिर्माण सेना

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Wadettiwar : जो-जो मोदींच्या, चोर ज्ञानेश कुमारच्या विरोधात आंदोलन करेल, त्या सर्वांना आमचा पाठिंबा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, म्हणाले, होळीपर्यंत महायुतीचे सरकार नष्ट होईल
जो-जो मोदींच्या, चोर ज्ञानेश कुमारच्या विरोधात आंदोलन करेल, त्या सर्वांना आमचा पाठिंबा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, म्हणाले, होळीपर्यंत महायुतीचे सरकार नष्ट होईल
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Shardiya Navratri 2026: ना बसायचं, ना झोपायचं! चक्क 9 दिवस उभं राहून देवीचा जागर? साताऱ्यातील 'या' गावची 350 वर्षांची अनोखी परंपरा!
ना बसायचं, ना झोपायचं! चक्क 9 दिवस उभं राहून देवीचा जागर? साताऱ्यातील 'या' गावची 350 वर्षांची अनोखी परंपरा!

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune News: पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Pradeep Purnekar Thane Crime: प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Nashik News: आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Embed widget