एक्स्प्लोर

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला : कर्नाटक नवनिर्माण सेना

कर्नाटक नवनिर्माण सेनेचा राज्याध्यक्ष भीमाशंकर पाटील याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला, अशी गरळ ओकली आहे.

बेळगाव : गेल्या चौसष्ट वर्षांपासून महाराष्ट्रात जाण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षाने बेजबाबदारपणाचे आणि बेताल वक्तव्य केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर थांबवून गोळ्या घाला अशी गरळ कर्नाटक नवनिर्माण सेनेचा राज्याध्यक्ष भीमाशंकर पाटील याने ओकली आहे. चौसष्ट वर्षांपासून सीमाभागातील सरकारी मालमत्तेचे आणि कन्नड जनतेच्या मालमत्तेचे महाराष्ट्र एकीकरण समिती नुकसान करत आहे. कन्नडिग जनतेच्या डोळ्यात कुसळा प्रमाणे टोचत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला, त्याला माझा पाठिंबा आहे असे बेदरकार वक्तव्य भीमाशंकर पाटील याने पत्रकार परिषदेत केली आहे. नागरिकत्व कायद्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या व्यक्तींना गोळ्या घाला असे वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी केले आहे. गेल्या चौसष्ट वर्षपासून महाराष्ट्र एकीकरण समिती सरकारी मालमत्तेचे नुकसान करत आहे. राकस्कोप जलाशयात विष टाकून कन्नड जनतेची हत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला असे सांगण्याचे धाडस मंत्री सुरेश अंगडी यांच्याकडे आहे काय असा हास्यास्पद सवालही भीमाशंकर याने पत्रकार परिषदेत केला. नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षानी केलेले वक्तव्य अज्ञानातून केलेले आहे.त्यांच्या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. महाराष्ट्र एकीकरण समितीने आजवर अनेक आंदोलने केली आहेत. पण आजवर कधीही सरकारी किंवा कन्नडीगाच्या मालमत्तेचे नुकसान केलेले नाही. मराठी भाषिक आणि कन्नड भाषिक यांच्यात वादावादी देखील कधी झालेली नाही. बाहेरील व्यक्ती येथे येऊन बेजबाबदार विधाने करुन शांती बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी अशा व्यक्तीची दखल घेऊन त्यांना योग्य ती समज देणे गरजेचे आहे. मराठी माणसाचा जर क्षोभ उसळला तर त्याची जबाबदारी पोलीस खाते आणि सरकारवर राहील अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी व्यक्त केली आहे.युवा समितीचे नेते शुभम शेळके यांनी देखील भीमाशंकर पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वाद - महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील सीमा वाद मागील कित्येक वर्षांपासून सुरु आहे. बेळगाव-कारवार-निपाणी तसेच परिसरातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्र राज्यात समाविष्ट होण्यासाठी आतूर आहे. कर्नाटक राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापन झाले तरी सीमा भागातील मराठी भाषिक जनतेवर कानडी भाषा शिकण्याची सक्ती केली जाते. काही वर्षांपूर्वी बेळगावचे नाव देखील तेथील सरकारने बदलले होते. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कर्नाटक सरकारमध्ये या ना त्या कारणावरुन वाद सुरु असतात. हेही वाचा - ...और हस्तियां डूब जाती है, संजय राऊतांची मोदी-शाहांवर बोचरी टीका Karnataka By-Poll Results | कर्नाटक पोटनिवडणुकीत 10 जागांवर भाजपची आघाडी | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget