भरत गोगावलेंचा व्हीप वैध, राहुल नार्वेकर यांचा निर्णय, ठाकरेंना दुसरा मोठा धक्का
Shiv Sena MLAs Disqualification Verdict : खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं सांगतानाच भरत गोगावले यांचा व्हीव वैध असल्याचं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
![भरत गोगावलेंचा व्हीप वैध, राहुल नार्वेकर यांचा निर्णय, ठाकरेंना दुसरा मोठा धक्का Shiv Sena MLA Disqualification Verdict final result Bharatshet Gogawale whip Shivsena aamdar apatrata nikal Maharashtra CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Rahul Narwekar Marathi News भरत गोगावलेंचा व्हीप वैध, राहुल नार्वेकर यांचा निर्णय, ठाकरेंना दुसरा मोठा धक्का](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/12/30c3942c1efc1597a1b8de534cf270941702385764339290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shiv Sena MLAs Disqualification Verdict : खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं सांगतानाच भरत गोगावले यांचा व्हीव वैध असल्याचं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. आमदार अपात्रेताच निकाल देताना राहुल नार्वेकर यांनी अनेक महत्वाची निरीक्षणं नोंदवली. त्यामध्ये उद्धव ठाकरेंची 2018 मध्ये पक्षप्रमुख म्हणून झालेली निवड अयोग्य,असल्याचेही महत्वाचं निरीक्षण नोंदवलं. दरम्यान, सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालावेळी भारत गोगावले यांच्या व्हीपवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
ठाकरेंना धक्का, पक्षप्रमुख म्हणून निवड अयोग्य -
ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून झालेली निवड अयोग्य आहे. आधीच्या 1999 घटनेनुसार उद्धव ठाकरेंना कोणालाही पदावरून हटवण्याचा अधिकार नाही. पण पक्ष नेतृत्वाचं मत हे पक्षाचं मत असं गृहित धरता येत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंना हटवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेऊ शकत नाहीत तो चुकीचा निर्णय आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मत हे पक्षाचे मत असू शकत नाही. त्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणी सोबत चर्चा करूनच निर्णय घेणे अपेक्षित आहे. पक्षप्रमुखांचं मत हे अंतिम नाही. त्यामुळे पक्षाच्या घटनेनुसार त्याला एखाद्याला पदावरून काढायचे अधिकार नाहीत. उद्धव ठाकरे गटाकडून जी कागदपत्र सादर केलीत त्यातही ब-याच तृटी आहेत. निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गटानं सादर केलेल्या दाव्यातही तफावत आहे. एकिकडे ते सांगतात पक्षाची बैठक सेनाभवनात झाली, तर दुसरीकडे सांगतात तीच बैठक ऑनलाईन झाली होती.त्यामुळे त्यांची कागदपत्र संभ्रम निर्माण करणारी आहेत. त्यामुळे साल 2018 मध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून झालेली निवड ही पक्षाच्या घटनेला अनुसर नसल्याचं स्पष्ट होतं, असे राहुल नार्वेकर म्हणाले.
भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून झालेली निवड ही वैध
बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना होती. भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून झालेली निवड ही वैध ठरते. 21 जून 2022 रोजी विधीमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसत आहे, त्यामुळे शिंदे गट हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष असल्याचे दिसून येते. सुनील प्रभूंना ती बैठक बोलावण्याचा कोणताही अधिकार नव्हता. त्यामुळे त्यातील गैरहजेरी ही ग्राह्य धरता येणार नाही, असे निरीक्षण अध्यक्षांनी नोंदवलं. शिंदे गटाच्या नेत्यांनी तो व्हीप मिळालाच नसल्याचं आधीच स्पष्ट केलंय. सुनील प्रभू यांनी तो व्हीप व्हॉट्सअॅपवर पाठवला होता, त्यामुळे तो सर्वांना मिळाल्याचे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत, असेही अध्यक्ष म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)