ठाकरे गटाचे आमदार खोटं बोलतात, तारखांचा घोळ आणि विरोधाभासी वक्तव्ये ; शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद
आमदार अपात्रता प्रकरणात ठाकरे गटाच्या युक्तिवादानंतर दुसऱ्या सत्रात शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे गटातर्फे खोट्या पुराव्याच्या आधारे दावे केले जात आहेत, असा युक्तिवाद महेश जेठमलानी यांनी केला आहे.
![ठाकरे गटाचे आमदार खोटं बोलतात, तारखांचा घोळ आणि विरोधाभासी वक्तव्ये ; शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद Shiv Sena MLA Disqualification Mahesh Jethmalani On Whip Rahul Narwekar Maharashtra News ठाकरे गटाचे आमदार खोटं बोलतात, तारखांचा घोळ आणि विरोधाभासी वक्तव्ये ; शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/19/b3f7198684f9a8b2fbe6a50a5c74a78e170297851223689_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर: शिवसेना (Shiv Sena) आमदार अपात्रतेच्या (MLA Disqualification) याचिकेवरील सुनावणी शेवटच्या टप्प्यात आली आहे. आमदार अपात्रता प्रकरणात ठाकरे गटाच्या युक्तिवादानंतर दुसऱ्या सत्रात शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे गटातर्फे खोट्या पुराव्याच्या आधारे दावे केले जात आहेत असं शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांनी म्हटलंय. तारखांचा घोळ आणि विरोधाभासी विधानं साक्षीत केल्याचं त्यांनी आपल्या युक्तिवादात म्हटलंय.
महेश जेठमलानी म्हणाले, खोट्या पुराव्याच्या आधारे ठाकरे गटाकडून दावे केले जात आहेत. 21 जून 2022 रोजी पाठवलेल्या व्हीपच्या तारखांमध्ये घोळ आहे. शिवसेना उद्धव ठकरे गटाचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी साक्ष देताना ते दिसून येते. 20 जूनला रात्री 11.30 ते 12 दरम्यान व्हीप बजावला म्हणून 21 तारीख लिहिल्याचे ते म्हणतात.व्हीप बजावताना आपल्यासोबत होते त्यांना त्याच ठिकाणी व्हीपची कॉपी दिली. काही जणांना आमदार निवास येथे देण्यात आले तर उर्वरित लोकांना मोबाईल द्वारे पाठवले आहे. आमदारांकडून पोहोचपावती म्हणून सही घेतली. साधारणपणे नियम असे सांगतो व्हीप जारी केल्यानंतर तो पिजन होल अर्थात टपाल पेटीत टाकायचे असतात किंवा ईमेल आयडी वर पाठवायचे असतात.
सुनील प्रभू यांचे वक्तव्य विरोधाभासी, जेठमलानी यांचा युक्तिवाद
सुनिल प्रभू यांनी साक्ष देताना सांगितले की, काही शिवसेना आमदार मिसिंग असल्यामुळे 20 जून 2022 रोजी रात्री व्हीप बजावण्यात आला होता. पण त्याच दिवशी 20 जूनला झालेल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये सर्व आमदारांनी मतदान केल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे हे विरोधाभासी वक्तव्य आहेत. जर आमदार मतदान करण्यास उपस्थित होते तर ते मिसिंग कसे असू शकतात. तसेच तारखांचा घोळ, आमदार संपर्काबाहेर असल्याचे कारण आणि व्हीप जारी करण्याची पद्धत यांवरून हा सर्व बनाव असल्याचे सिद्ध होते, असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला आहे.
सुनील प्रभू यांनी उलट साक्ष देताना सांगितले उदय सामंत, दादा भुसे, संजय राठोड लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर सह्या केल्या मात्र हा दावा या सर्वांनी फेटाळला आहे. मग अशी बैठक झाली असेल तर ठाकरे गटाचे अन्य लोक साक्ष द्यायला का आले नाहीत, असा सवाल जेठमलानी यांनी केला आहे.
हे ही वाचा :
पक्षातली फूट हा नियोजित राजकीय कट, एका रात्रीत हे शक्य नाही; मोठ्या दाव्यानंतर ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद संपला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)