एक्स्प्लोर

पक्षातली फूट हा नियोजित राजकीय कट, एका रात्रीत हे शक्य नाही; मोठ्या दाव्यानंतर ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद संपला

 शिंदे गटातील आमदार उत्तर देतात की आम्ही एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिला आम्ही त्यांच्यासोबत आहोत याचा अर्थ जर एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले तर हे सुद्धा अपात्र ठरणार, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला आहे.

नागपूर शिवसेना (Shiv Sena)  आमदार अपात्रतेच्या (MLA Disqualification)  याचिकेवरील सुनावणी शेवटच्या टप्प्यात आली आहे.  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)  यांच्यासमोरील ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तीवाद संपला. आज ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत (Devadatt Kamat) यांनी  पक्षातली फूट हा नियोजनबद्ध राजकीय कट असल्याचा युक्तिवाद आज कोर्टात केला आहे. 20 आणि 21 जून 2022 ला जे घडलं ते एका रात्रीत होत नाही, यासाठी प्लॅनिंग केलं गेलं होतं 

आमदार अपात्रता प्रकरणात ठाकरे गटाच्या वकिलांचा अध्यक्षांसमोर युक्तिवाद पूर्ण झाला आहे.  कामत म्हणाले,  20 आणि 21 जून 2022 ला जे घडलं ते एका रात्रीत होत नाही. यासाठी प्लॅनिंग केलं गेलं होतं . ते उत्तर देताना म्हणत आहे की,  शिवाजी महाराज गेले म्हणून आम्ही सुरतला गेलो. तुम्ही तुमच्या राजकीय महत्त्वकांक्षेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाव घेत आहे आणि अवमान करताय. हे सगळे आमदार एकाच वेळी निघतात आणि एकाच ठिकाणी एकाच हॉटेलमध्ये जातात आणि विरोधीपक्षाला पाठींबा द्यायला तयार होतात ? हा सगळा राजकीय नियोजन बद्ध कट होता हे या सगळ्या घटनांकडे पहिल्यावर दिसतंय.

ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद जसाच्या तसा

कामत म्हणाले, राजकीय पक्ष विधीमंडळ पक्षाला ब्लॅक चेकप्रमाणे अमर्याद अधिकार देऊ शकत नाही. विधीमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाच्या मार्गदर्शनानेच काम करत असतो. राजकीय पक्षाच्या विचारधारेनुसार विधीमंडळ पक्ष काम करत नसेल तर त्यावर अंकुश ठेवण्याचा अधिकार राजकीय पक्षाला आहे. 2018 पर्यंत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून विरोध केला नाही किंवा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात अध्यक्ष पदासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीत निवडणूक लढवली नाही.  तुम्हाला पक्षाच्या अध्यक्षांचे विचार पटत नसतील, तर लोकशाहीने निवडणूक घेऊन त्यांना हटवण्याचे अधिकार दिलेले आहेत.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना कशी होऊ शकते? ठाकरे गटाच्या वकिलांचा सवाल

एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे असा दावा प्रतिज्ञापत्रमध्ये दावा करण्यात आला आहे. 20 जून 2022 पर्यंत शिवसेना पक्ष एकच असताना त्याची घटना रचना असताना 21 आणि 22 जून ला आमदार उपस्थित राहिले नाही. ते सुरतला, गुवाहाटीला गेले. 29 जूनला राज्यपालांकडे गेले. त्यांची बैठकीला अनुपस्थिती हीच पक्षविरोधी कृती आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये दावा करण्यात आलाय की एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना कशी होऊ शकते? असा सवाल कामत यांनी केला.  शिंदे गटातील आमदार उत्तर देतात की आम्ही एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिला आम्ही त्यांच्यासोबत आहोत याचा अर्थ जर एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले तर हे सुद्धा अपात्र ठरणार, असेही कामत म्हणाले. 

भरत गोगावले हे खोटे बोलतात : देवदत्त कामत

सद्‌सद्‌विवेक बुद्धी स्मरून मतदान करता येत नाही. पक्षाने बजावलेला व्हीपनुसारच मतदान करावे लागते. पक्षाची विचारधारा जपणे ही विधीमंडळ सदस्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे काम आहे. या संपूर्ण प्रक्रियेत त्यांनी व्हीप कसा बजावला, याची माहिती त्यांना दाखवता आली नाही. थेट शेवटच्या साक्षीदाराने (भरत गोगावले) मोबाईल फोन दाखवत व्हीप बजावल्याचे सांगितले.हा मोबाईल क्रमांक साक्षीदारांच्या नावावरच नसल्याचे त्यांनी मान्य केले. शेवटच्या दिवशी हा कागद दाखवला जातो. प्रथमदर्शनी हे दिसून येते की नंबर हा मित्राच्या नावावर असल्याचे सांगत असताना हा बनाव असल्याचे स्पष्ट होते. महत्त्वाची बाब म्हणजे हॉटेलवरुन विधीमंडळात पोहचलेली वेळ व व्हीप बजावलेली वेळ याबाबत साक्ष देताना तफावत दिसून येते. त्यामुळे भरत गोगावले हे खोटे बोलत असल्याचे सिद्ध होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget