बापाचं नाव बापच असतं, निवडणूक आयोग आमचा बाप नाही, ते तर वेठबिगार; शिवसेनेचा हल्लाबोल
Arvind Sawant On Election Commission : उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील लढाईत दोन्ही गटाला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shivsena Election Symbol Bow And Arrow) गोठवण्यात आलं आहे.
मुंबई : ईडी, सीबीआयसारख्या देशातील स्वायत्त संस्था वेठबिगार झाल्याचे संपूर्ण देशाने पाहिले होते. आता निवडणूक आगोय ही स्वायत्त संस्था देखील विठबिगार झाली आहे. बापाचं नाव बापच असतं, निवडणूक आयोग आमचा बाप नाही, ते तर वेठबिगार असा हल्लाबोल शिवसेनेने केलाय. शिवसेनेचं धनुष्यबान हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केलाय.
उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील लढाईत दोन्ही गटाला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shivsena Election Symbol Bow And Arrow) गोठवण्यात आलं आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिलाय. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच अरिंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"निवडणूक आयोगाकडे अर्ज केल्यानंतर कोणीतरी तक्रार केली. परंतु, आयोगाने त्याची छाननी केली नाही. शिवाय आम्ही उत्तर दिलेलं त्याची देखील छाननी करण्यात आली नाही. छाननी न करताच अवघ्या चार तासात निर्णय दिलाय. निवडणूक आयोग कोणाच्या आदेशावर चालत आहे? असा प्रश्न अरविंद सावंत यांनी उपस्थित केलया. देश हुकमशाहीकडे चाललाय. छाननी न करता दिलेला निर्णय हा देशाच्या संविधानावर घाव घालणारा निर्णय आहे. शिवाय हा धक्कादायक निर्णय आहे, असे देखील सावंत यांनी म्हटलं आहे.
"लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेच्या पाठीत सुरा खूपण्याचं काम केलं जातंय. भाजपचे अनेक लोक न्यायालयाचा आणि निवडणूक आयोगाचा निर्णय येण्याआधीच शिंदेची शिवसेना खरी असल्याचे सांगत होते. त्यातच आता निवडूक आयोगाने हा निर्णय दिलाय. त्यामुळे निवडणूक आयोगावर संशय निर्माण होत आहे. संपूर्ण महाराष्ट्र हे सर्व डोळे उघडे ठेवून पाहत आहे. जेवढा आम्हाला त्रास दिला जाईल तेवढी बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना बळकट होईल, असा अविश्वास अरविंद सावंत यांनी यावेळी व्यक्त केलाय.
महत्वाच्या बातम्या