एक्स्प्लोर

Maharashtra Politics Shivsena: धनुष्यबाण कोणाचा? शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला उत्तर सादर, वकील म्हणतात...

Maharashtra Politics Shivsena: शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबतची लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. येत्या काही दिवसांत निवडणूक आयोग धनुष्यबाणाबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Shivsena: मागील तीन दशकांहून शिवसेनेची निवडणुकीत ओळख असलेल्या धनुष्य बाण (Shivsena Election Symbol Bow And Arrow) या निवडणूक चिन्हावरील दाव्याची लढाई निर्णायक टप्प्यावर पोहचली आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) आज दुपारी दोन वाजेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. दुपारी दोन वाजण्याच्या काही मिनिटे आधीच शिवसेनेने वकिलांमार्फत निवडणूक आयोगाकडे आपले उत्तर सादर केले आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या (Andheri Bypoll Election) पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग निवडणूक चिन्हाबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

शुक्रवारी, शिवसेनेच्या ठाकरे गटाने 800 पानांचे उत्तर निवडणूक आयोगाला सादर केले होते. हे 800 पानी उत्तर पक्षातील फुटीबाबतची माहिती देणारे होते. त्यानंतर आज शिवसेनेने वकिलांमार्फत निवडणूक चिन्ह धनुष्यबाणाबाबत दावा सादर केला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर शिवसेनेच्या वकिलांनी सांगितले की, आम्ही निवडणूक आयोगाकडे  राष्ट्रीय कार्यकारणीतील सदस्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्याशिवाय अडीच लाखांहून अधिक प्रतिज्ञापत्र दिले असून आता लवकरच 10 ते 12 लाख पक्ष सदस्य नोंदणी आयोगासमोर सादर करणार आहोत. निवडणूक आयोगाला उत्तर दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

अंधेरीतील पोटनिवडणुकीसाठी 14 ऑक्टोबरपर्यंतची मुदत आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी आणि निवडणूक चिन्हासाठी देण्यात येणारा ए,बी फॉर्म देण्याचा अधिकारी सध्या तरी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाने पक्षाचे अध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे असल्याचे दावा प्रतित्रापत्रात केला आहे. निवडणूक आयोग येत्या काही दिवसातच शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत महत्त्वाचे निर्देश देण्याची शक्यता आहे. 

शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत निवडणूक आयोगाचे कामकाज 

शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे आणि इतर बाबीनंतर निवडणूक आयोगाचे कामकाज मध्यरात्रीपर्यंत सुरू होते. त्यानंतर निवडणूक आयोनाने दोन्ही गटांना मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास आपले उत्तर सादर करण्याचे निर्देश दिल होते. या निर्देशानुसार, आज दुपारी 12 वाजेपर्यंत उत्तर सादर करण्याची सूचना निवडणूक आयोगाने केली होती. 

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे राष्ट्रीय कार्यकारणी, प्रतिनिधी सभेतील बहुतांशी सदस्य आहेत. पक्षाच्या घटनेनुसार, पक्षाची कार्यकारणी, प्रतिनिधी सभा मोठी असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. शिवसेनेचे संघटनात्मक बळ उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचे चित्र सध्या आहे.

तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 आमदार, 12 खासदार असे संसदीय पक्षाचे बहुमत आहे. एकनाथ शिंदे यांनी आपणच पक्षाचे अध्यक्ष असल्याचा दावा केला आहे. विधीमंडळ पक्षाचे बहुमत आमच्याकडे असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Godse : एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
Saudi Prince Salman : सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
Rameshwaram Cafe Blast : रामेश्वरम कॅफे स्फोटातील संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला एनआयएकडून 10 लाखांचे बक्षीस
रामेश्वरम कॅफे स्फोट : संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला NIAकडून 10 लाखांचे बक्षीस
OBC Bahujan Party on Shahu Maharaj : शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 PM : 29 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 29 March 2024Kolhapur Loksabha Election 2024 : बंटी-मुन्ना कधी एकत्र येणार? जय-वीरुची  बुलेट राईड !!Prakash Ambedkar Sharad Pawar Sanjay Raut : मविआ आणि वंचित युतीच्या पुन्हा चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Godse : एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
Saudi Prince Salman : सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
Rameshwaram Cafe Blast : रामेश्वरम कॅफे स्फोटातील संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला एनआयएकडून 10 लाखांचे बक्षीस
रामेश्वरम कॅफे स्फोट : संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला NIAकडून 10 लाखांचे बक्षीस
OBC Bahujan Party on Shahu Maharaj : शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
MS Dhoni And Pathirana Video: गोलंदाजीआधी मथिशा पथिराना खरंच MS धोनीच्या पाया पडला?; अखेर सत्य आले समोर, पाहा Video
गोलंदाजीआधी मथिशा पथिराना खरंच MS धोनीच्या पाया पडला?; अखेर सत्य आले समोर, पाहा Video
Harshvardhan Patil : इंदापूरबाबत योग्य ती भूमिका घेऊ, आता बारामतीत अजित पवारांना मदत करा; फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले
विजय शिवतारेंनंतर आता हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले; बारामतीत अजित पवारांना मदत करणार, पण...
Satej Patil on Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर
Video : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2024 | शुक्रवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2024 | शुक्रवार
Embed widget