Sharad Ponkshe : हिंदू राष्ट्र कायम ठेवायचं असेल तर मोदींनी पायउतार व्हावं, योगींकडे सत्ता सोपवावी; शरद पोंक्षेंची मागणी
Sharad Ponkshe On Hindu Rashtra : देशावर हजारो वर्षांपासून अनेक आक्रमणं झाली, पण कुणालाही हिंदू धर्म संपवता आला नाही असं मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलं.
![Sharad Ponkshe : हिंदू राष्ट्र कायम ठेवायचं असेल तर मोदींनी पायउतार व्हावं, योगींकडे सत्ता सोपवावी; शरद पोंक्षेंची मागणी Sharad Ponkshe On Hindu Rashtra said naredra modi should step down yogi adityanath to be pm prime ninister for hindu rashtra sangli speech marathi Sharad Ponkshe : हिंदू राष्ट्र कायम ठेवायचं असेल तर मोदींनी पायउतार व्हावं, योगींकडे सत्ता सोपवावी; शरद पोंक्षेंची मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/10/14f099de0667b5f2a5693c6766c67bd7172599069361393_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : हजारो वर्षांपासून भारतावर अनेकांची आक्रमण झाली, पण कुणालाही हिंदू धर्म संपवता आला नाही. पण या खुळचट कल्पनेत कायम राहू नये. भारताला हिंदू राष्ट्र कायम ठेवायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचं नेतृत्व हे योगी आदित्यनाथ यांच्याकडे द्यावं असं मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलं. सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थान ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सांगलीतील राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने शरद पोंक्षे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. 'भारत: काल, आज आणि उद्या' या विषयावर त्यांनी आपले मत मांडलं. शरद पोंक्षे यांनी हिंदू राष्ट्रावर आणि त्याच्या भवितव्यावरही परखड मत मांडलं.
हिंदू धर्मासाठी एकच देश
मुस्लिमांना त्यांच्या हक्काची अनेक राष्ट्रं आहेत. हिंदू धर्मासाठी भारत हा एकच देश आहे. इथून हाकललं तर आसरा घ्यायला आपल्याला दुसरं राष्ट्र नाही. त्यामुळे भारताला हिंदू राष्ट्र कायम ठेवायचं असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचं नेतृत्व योगी आदित्यनाथ यांच्याकडे द्यावं असं मत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलं.
Sharad Ponkshe On Hindu Rashtra : काय म्हणाले शरद पोंक्षे?
भारताला हिंदू राष्ट्र कायम ठेवायचं असेल तर 2027-2028 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेतून पायउतार व्हावं आणि योगी आदित्यनाथ यांच्याकडे देशाची सत्ता सोपवावी. 'सब का साथ, सब का विकास' यामुळे आता मळमळायला लागलं आहे असं शरद पोंक्षे म्हणाले.
View this post on Instagram
शरद पोंक्षे म्हणाले की, "आज हिंदूंना संपवण्यासाठी जाती-जातींमध्ये विष पेरलं जात आहे. आपण यापासून दूर राहून सनातनी संस्कृती टिकवायला हवी. ज्या क्षणी आपण 49 टक्क्यांवर आलो त्या क्षणी आपला देश संपेल. पण घाबरू नका, हे काही शक्य नाही. निसर्गाने ज्याला बनवलंय त्याला कुणी संपवू शकत नाही. हा निसर्गच निसर्गाला संपवेल, माणूस नाही. हजारो वर्षांपासून, चौथ्या पाचव्या शतकापासून देशावर अनेक आक्रमणं झाली. पण कुणाच्यात धमक झाली नाही हिंदू राष्ट्र संपवण्याची. कुणालाही जमलं नाही. ग्रीक, पोर्तुगीज, मुघल, ब्रिटिशांना, शकांनी, तुर्कांनीही आक्रमण करून त्यांचा देश बनवता आला नाही, कधी ते शक्यही होणार नाही. पण म्हणून या खुळचट कल्पनेत राहू नये. अखंड सावध असावे असं समर्थ म्हणतात."
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)