एक्स्प्लोर

NCP Crisis : सूर्यफूल, चष्मा ते उगवता सूर्य, शरद पवार गटाकडून नव्या चिन्हांची चाचपणी, कोणतं चिन्ह फायनल होणार?

Sharad Pawar Party New Name and Symbol : पक्षाचं चिन्ह आणि पक्ष अजित पवारांकडे सोपवल्यावर आता शरद पवार गटाकडून नव्या नावांचा विचार सुरू आहे.

NCP Crisis Latest Update : शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून नवे नाव, चिन्हासाठी चाचपणी सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचं चिन्ह (Symbol) आणि पक्ष (Party) अजित पवारांकडे (Ajit Pawar) सोपवल्यावर आता शरद पवार गटाकडून नव्या नावांचा (New Party Name) विचार सुरू आहे. शरद  पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी, शरद स्वाभिमानी पक्ष या नावांचा पर्याय सध्या चाचपून पाहिला जातोय. तर कपबशी, सूर्यफूल, चष्मा, उगवता सूर्य या चिन्हांचा विचार सुरू आहे.

शरद पवार गटाकडून नवे नाव, चिन्हासाठी चाचपणी

शरद पवार गटाला मंगळवारी दुपारपर्यंत नवीन पक्षाचं नाव निवडणूक आयोगाकडे (Election Commission) द्यावं लागणार आहे. पक्षाचं चिन्ह नंतर दिलं तरी चालेल, मात्र पक्षाचं नाव आज दुपारपर्यंत द्यावं लागणार आहे. दरम्यान, आज दुपारपर्यंत शरद पवार गटाकडून नाव आणि पक्षाचं चिन्ह सादर करण्यात येणार आहे. नव्या पक्षासाठी शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी स्वाभिमानी पक्ष या नावांचा विचार आणि चर्चा सुरु आहे. तर चिन्हांसाठी कपबशी, सूर्यफूल, चष्मा, उगवता सूर्य या चिन्हांचा विचार सुरु आहे. काही वेळात या संदर्भात निर्णय समोर येईल.

निवडणुकीआधी शरद पवारांना मोठा धक्का

महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच आहे, असा निर्वाळा निवडणूक आयोगानं दिला आहे. पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला दिलं आहे, तर शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. लोकसभा निवडणुकीआधी शरद पवार गटाला हा अतिशय मोठा धक्का आहे. कारण महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरेंच्या हातून याआधीच पक्ष गेला होता, त्यात आता शरद पवारांची देखील भर पडली आहे. 

शरद पवारांची भूमिका काय?

अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवारांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. शरद पवारांच्या भूमिकेबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पक्ष आणि चिन्हाचं नाव ठरल्यानंतर शरद पवार माध्यमांसमोर प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या अधिवेशनानंतर शरद पवार त्यांच्या भूमिकेबाबत खुलासा करण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. 

पाहा व्हिडीओ : शरद पवार गटाकडून कोणत्या नाव आणि चिन्हाचा विचार? शरद पवार काँग्रेस की शरद स्वाभिमानी पक्ष?

महत्त्वाच्या इतर बातम्या :

NCP Crisis : शरद पवारांपेक्षा अजित पवार सरस? शरद पवारांचा पराभव झाला की हा सगळा ड्रामा? पिंपरी चिंचवडकर म्हणतात...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: बारामती पोटनिवडणुकीचं चित्र आज स्पष्ट होणार, काँग्रेस माघार घेणार?
Maharashtra Live Blog Updates: बारामती पोटनिवडणुकीचं चित्र आज स्पष्ट होणार, काँग्रेस माघार घेणार?
Eknath Shinde: पूर्ण कार्यकारिणी बरखास्त करुन टाकली, सज्जड दमही दिला...; एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत काय काय घडलं?
पूर्ण कार्यकारिणी बरखास्त करुन टाकली, सज्जड दमही दिला...; एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत काय काय घडलं?
उजनी जल पर्यटनाच्या विरोधात शेतकरी आक्रमक, 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरु, अतिरक्त संपादीत जमिनी परत देण्याची मागणी
उजनी जल पर्यटनाच्या विरोधात शेतकरी आक्रमक, 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरु, अतिरक्त संपादीत जमिनी परत देण्याची मागणी
व्हिएतनामच्या कंपनीकडून महाराष्ट्रात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, 5 हजार एकरवर विविध प्रकल्प उभारणार, 25 हजार रोजगार निर्माण होणार
व्हिएतनामच्या कंपनीकडून महाराष्ट्रात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, 5 हजार एकरवर विविध प्रकल्प उभारणार, 25 हजार रोजगार निर्माण होणार

व्हिडीओ

Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report
Cockroach Found In Vande Bharat Meal : झुरळ खिचडीत रेल्वे अडचणीत Special Report
Pune Cyber Scam : 54 कोटींच्या आमिषाला भुलले अन् 12 कोटी गमावले Special Report
Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
GT vs DC IPL 2026 : डेव्हिड मिलरनं दिल्लीला विजयाजवळ पोहोचवलं पण एका निर्णयानं पराभवाचा झटका, गुजरातचा पहिला विजय
केएल राहुलचं अर्धशतक वाया, डेव्हिड मिलरचा एक निर्णय अन् दिल्लीचा पराभव, गुजरातचा रोमांचक लढतीत विजय
Iran : शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
Pune Cyber Fraud : शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
Embed widget