एक्स्प्लोर

Sharad Pawar : इंदिरा गांधींना दिलेला शब्द बाळासाहेबांनी पाळला, आताही राज्य सरकार पाच वर्षे टिकेल: शरद पवार

NCP : पंतप्रधानांच्या भेटीनंतर शिवसेना काही वेगळी भूमिका घेईल असं कोणाला वाटत असेल तर ते वेगळ्या नंदनवनात राहतात असा विरोधकांचा खरपूस समाचार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) घेतला

मुंबई : पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज्य सरकार पडणार अशा वावड्या अनेकांनी उठवायला सुरुवात केली आहे. जनता पक्षाचं सरकार आलं त्यावेळी बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना मदत करण्याचा शब्द दिला होता, तो त्यांनी पाळला. आताही शिवसेना वेगळी भूमिका घेणार नाही. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे टिकेल असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केला आहे. ते पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. 

शरद पवार म्हणाले की, "राज्य सरकारचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांना भेटलं. त्यानंतर अशा बातम्या आल्या की पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये खासगी भेट झाली आणि चर्चा झाली. आता हे सरकार पडणार अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वावड्या अनेकांनी पसरवायला सुरुवात केली आहे."

शरद पवार पुढे म्हणाले की, "जनता पक्षाचं सरकार आलं त्यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसचा सगळीकडे पराभव होत असताना शिवसेना हा पक्ष काँग्रेसला पाठींबा देण्यासाठी पुढे आला. त्या वेळी शिवसेनेने काँग्रेसला मदत करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. त्याचाच भाग म्हणून शिवसेना विधानसभेसाठी एकही उमेदवार उभा करणार नाही असा बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना शब्द दिला आणि तो पाळला. हा इतिहास आहे."

आताही पंतप्रधानांच्या भेटीनंतर शिवसेना काहीशी वेगळी भूमिका घेईल असं जर कोणाला वाटत असेल तरे ते वेगळ्या नंदनवनात राहतात असा विरोधकांचा खरपूस समाचार शरद पवारांनी घेतला. ते म्हणाले की, "आज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित काम करतात. माझा शिवसेनेसोबतचा पूर्वीचा अनुभव हा विश्वासाचा आहे. हे सरकार टिकेल, पाच वर्षे काम करेल. एवढंच नाही तर येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हे तिनही पक्ष एकत्रित काम करतील यात शंका नाही."

शिवसेना आणि आपण एकत्र येऊ हे एकेकाळी कुणालाही पटलं नसतं, पण आज एकत्र आहोत. त्यामुळे हे सरकार पडणार या निरर्थक चर्चा असल्याचं त्यांनी सांगितलं. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget