(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोना दौऱ्यात शरद पवार यांनी मोहिते पाटील विरोधकांच्या गाठीभेटी घेतल्याने चर्चांना उधाण
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नियोजित कोरोना दौऱ्यातून वेळ काढत मोहिते-पाटील विरोधकांच्या भेटीगाठी घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भविष्यात मोहिते-पाटील यांच्या विरोधकांना बळ मिळाले तर आश्चर्य वाटायला नको.
सोलापूर : कोरोना बैठकीसाठी निघालेल्या शरद पवार यांनी आज माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटलांच्या कट्टर विरोधकांना वेळ देत भेटीगाठी घेतल्याने मोहिते समर्थकांत अस्वस्थता पसरली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडलं होतं. यावेळी राष्ट्रवादीचे खंदे समर्थक समजले जाणारे मोहिते पाटील देखील भाजपवासी झाले. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या या भेटीला महत्व आहे. त्यामुळे भविष्यात मोहिते पाटील विरोधकांना बळ मिळाले तर आश्चर्य वाटायला नको.
आज सकाळी शरद पवार हे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समवेत बारामती येथून कोरोना बैठकीसाठी सोलापूरला निघाले. या शासकीय कार्यक्रमात केवळ माळशिरस तालुक्यातील रमेश पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट देणार होते. त्याप्रमाणे पवार यांनी सकाळी रमेश पाटील यांच्या निवासस्थानी वाकडी वाट करून जात त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. वास्तविक रमेश पाटील यांचे कुटुंब शरद पवार समर्थक म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध असून रमेश पाटील हा राष्ट्रवादीचा साधा निष्ठावंत कार्यकर्ता आहे.
दिलासादायक... मुंबईत दोन आठवड्यात तर राज्यात 2 महिन्यात कोरोनावर नियंत्रण शक्य, IIT मुंबईचा अहवाल
मोहिते पाटील यांच्या कट्टर विरोधकांची फौजच पवारांच्या भेटीसाठी थांबली होती कण्हेर येथून थेट सोलापूरला जाणार असा समाज असताना पवार यांच्या वाहनांचा ताफा माळशिरस मधील मोहिते पाटील विरोधक डॉ. रामदास देशमुख यांच्या घराकडे वळला. येथे मोहिते पाटील यांच्या कट्टर विरोधकांची फौजच पवारांच्या भेटीसाठी थांबली होती. येथे या सर्व नेत्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर पवार सोलापूरला निघाले खरे मात्र पुन्हा वेळापुरात उत्तम जानकर यांच्या निवासस्थानाकडे अचानक गाडी वळवली. जानकर यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करीत विधानसभा निवडणूक लढवली होती. येथे चक्क जानकर यांनी शरद पवार यांचेवर तयार केलेल्या पोवाड्याचे प्रदर्शन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते केले. पवार साहेबांना हा पोवाडा दाखवायला सुरुवात करताच खुद्द पवारांनीच तो बंद करायला लावला.
मोहिते समर्थकांचा जीव टांगणीला येथे माळशिरस तालुक्यातील गोरगरीब नागरिकांसाठी सुरु केलेल्या धान्यबँकेतून पवारांच्या हस्ते काही महिलांना धान्याचे वाटप करण्यात आल्यावर मग पवारांचा ताफा सोलापूरकडे रवाना झाला. मात्र, पवार माळशिरस तालुक्यात असेपर्यंत मोहिते समर्थकांचा जीव टांगणीला लागला होता. नेहमी शिवरत्नावर बैठक घेणारे पवार आज चक्क मोहिते विरोधकांच्या शिवतीर्थ आणि गरुड बंगल्यावर थांबल्याने मोहिते समर्थकांत चांगलीच अस्वस्थता पसरली आहे.
Coronaviru Effect | लॉकडाऊनमुळे लोककलावंतांवर आर्थिक संकट; उपासमारीची वेळ