एक्स्प्लोर

मोदींविरोधात आक्षेपार्ह मजकूर, नोटीस मिळालेल्या तरुणांची पवारांसोबत बैठक

सोशल मीडियावर सरकार विरोधात लिहणाऱ्या तरुणांसोबत शरद पवार यांनी चर्चा करणार आहेत. या सर्व तरुणांना सरकारविरोधी लिखाण केल्याप्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. वाय बी चव्हाण प्रतिष्ठानला ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई : सोशल मीडियावर सरकार विरोधात लिहणाऱ्या तरुणांसोबत शरद पवार यांनी चर्चा करणार आहेत. या सर्व तरुणांना सरकारविरोधी लिखाण केल्याप्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. वाय बी चव्हाण प्रतिष्ठानला ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार या 35 तरुणांसोबत चर्चा करणार आहेत. या बैठकीला आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित राहणार आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने 27 तरुणांना नोटीस पाठवली आहे आहे. फेसबुकवरील ‘देव गायकवाड’ फेक अकाऊंट प्रकरणी नोंद गुन्ह्याच्या तपासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी या नोटिसा आहेत. दरम्यान ही कारवाई म्हणजे आणीबाणी असून, सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला होता. “राज्यातील महागाई, बेरोजगारी व मंत्र्यांचे भ्रष्ट्राचार या विरुद्धचा जनआक्रोश दडपून टाकण्यासाठी राज्य सरकारकडून पोलिसी बळाचा गैरवापर सुरु आहे. पोलिसांनी निवडून पत्रकारांना बोलावणं व चौकशीच्या नावाखाली धमकावणं, ही दुसऱ्या आणीबाणीची चाहूल आहे. पत्रकारांना धमकावणं सरकारला महाग पडेल.”, अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निषेध केला होता. काय आहे प्रकरण? काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील ‘देव गायकवाड’ नावाच्या फेक अकाऊंट प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी काही जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील निधी कामदार यांनी याविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार केली होती. सायबर सेलमध्ये या प्रकरणी गुन्हा क्र. 109/2017 नुसार भादवि कलम 419, 420, 465, 468, 469, 471 आणि 354D, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 66C, 66D आणि 67 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दुसरीकडे, महेंद्र रावले यांसह काही जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याने नोटीस पाठवली आहे. ही नोटीस मुंबईतील कांजुरमार्ग पोलिस ठाण्याने बजावली आहे. पोस्टमुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. नोटीस मिळालेले युवक:
  1. आशिष मेटे , औरंगाबाद
  2. मानस पगार , नाशिक
  3. विकास गोडगे , उस्मानाबाद
  4. शंकर बहिरट , पुणे
  5. योगेश वगाज , सोलापूर
  6. श्रेणिक नरदे , कोल्हापूर
  7. सचिन कुंभार , सांगली
  8. ब्रम्हा चट्टे, सोलापूर
इतर तरुण :
  1. डॉ. अमर जाधव
  2. मल्हार टाकळे
  3. योगेश बनकर
  4. आकाश चटके
  5. राहुल आहेर
  6. योगेश गावंडे
  7. इम्रान शेख
  8. शरद पवार
  9. अमित देसाई
  10. धीरज वीर
  11. भाऊसाहेब टरमले
  12. मयुर अंधारे
  13. अक्षय वळसे
  14. अक्षय गवळी
  15. प्रदिप तांबे
  16. विकास मेंगाणे
  17. विकास जाधव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कॉवतांनी स्पष्टच सांगितलं
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कॉवतांनी स्पष्टच सांगितलं
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
Nashik Accident: मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 03 PM 13 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सManoj Jarange  Beed : त्यांना काही झालं तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगण मुश्कील करेन,जरांगेंचा इशाराDhananjay Deshmukh Beed PC : ॲट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला नाही..? धनंजय देशमुख यांचे खरमरीत सवालDhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कॉवतांनी स्पष्टच सांगितलं
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कॉवतांनी स्पष्टच सांगितलं
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
Nashik Accident: मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
Embed widget