एक्स्प्लोर
Advertisement
Sharad Pawar : पुलोद सरकारमध्ये 17 कॅबिनेट मंत्री तर 16 राज्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री; 45 वर्षांपूर्वी शरद पवारांचे पहिले मंत्रिमंडळ असे होते...
Sharad Pawar First Time CM : शरद पवार आणि त्यांच्या 40 समर्थक आमदारांनी वसंतदादा पाटील सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि राज्यात पुलोदचे सरकार अस्तित्वात आलं.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आजपासून बरोबर 45 वर्षांपूर्वी एक विक्रम रचला होता. 18 जुलै 1978 रोजी त्यांनी पुलोद सरकारचे मुख्यमंत्री (Sharad Pawar First Time CM ) म्हणून शपथ घेतली आणि ते राज्याचे सर्वात तरूण मुख्यमंत्री बनले. शरद पवार वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी मुख्यमंत्री बनले आणि तो विक्रम अद्यापही अबाधित आहे. एक उपमुख्यमंत्री, 17 कॅबिनेट मंत्री आणि 16 राज्यमंत्री अशी रचना असलेलं शरद पवारांचे मंत्रिमंडळ होतं.
शरद पवार आणि त्यांच्या 40 समर्थक आमदारांनी वसंतदादा पाटील सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि सरकार अल्पमतात आलं. शरद पवारांनी त्यांच्या समर्थकांसह समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि इतर बिगर काँग्रेस पक्षांना सोबत घेत पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोदचा प्रयोग केला. हा राज्यातील पहिलाच आघाडीचा प्रयोग होता आणि तो यशस्वीही झाला.
पुलोद सरकारमध्ये शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि सुंदरराव सोळंखे उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्या सरकारमध्ये सुशिलकुमार शिंदे, एनडी पाटील, उत्तमराव पाटील, भाई वैद्य, गोविंदराव आदिक, शंकरराव चव्हाण हे नेते होते.
शरद पवारांचे पुलोद सरकारचे मंत्रिमंडळ खालीलप्रमाणे,
1. शरद पवार- बारामती- मुख्यमंत्री
2. सुंदरराव सोळंके- माजलगाव- उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री
कॅबिनेट मंत्री
3. उत्तमराव पाटील- पावला - भडगाव, महसूल
4. हशू अडवाणी- चेंबूर - शहर विकास, नागरी विकास
5. सदानंद वरदेवांद्रे - शिक्षण
6. जगन्नाथराव जाधव- संगमेश्वर- अन्न आणि नागरी पुरवठा
7. गणपतराव देशमुख- सांगोळे- फलोत्पादन
8. शंकरराव चव्हाण- भोकर - जल संसाधने, उद्योग.
9. अर्जुनराव कस्तुरे- शेती
10. एन डी पाटील- एमएलसी- सहकार
11. निहाल अहमद मौलवी मोहम्मद उस्मान- मालेगाव- तंत्र आणि उच्च शिक्षण
12. गोविंदराव आदिक- श्रीरामपूर- महिला आणि बाल विकास
13. सुशीलकुमार शिंदे- सोलापूर उत्तर - मृद व जलसंधारण
14. भाऊसाहेब सुर्वे- नागपूर मध्य - मागासवर्गीय विकास
15. प्रमिला टोपले - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
16. हसमुखभाई उपाध्याय- कांदिवली- अन्न आणि औषध
17. छेडीलाल गुप्ता- सार्वजनिक बांधकाम विभाग
राज्यमंत्र्यांची यादी
1. भाई वैद्य- भवानी पेठ
2. दत्ता मेघे- एमएलसी
3. शंकरराव काळे- अहमदनगर
4. प्रतापराव बाबुराव भोसले - वाई
5. दिलवरसिंग पाडवी- क्कलकुवा
6. इशाक जमखानवाला
7. किसनराव देशमुख
8. सखाराम नखाते
9. श्रीपतराव बोंद्रे- सांगरूळ
10. भाऊराव मुळक- नागपूर पश्चिम
11. बाळकृष्ण पाटील- खालापूर
12. विनायक पाटील- निफाड
13. पदमसिंह बाजीराव पाटील- उस्मानाबाद
14. शांती नाईक- शिवाजीनगर
15. बबनराव ढाकणे- पाथर्डी
16. नामदेव गाडेकर- सिल्लोड
ही बातमी वाचा:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
विश्व
राजकारण
रत्नागिरी
Advertisement