एक्स्प्लोर
शरद पवारांकडून 50 वर्षांच्या संसदीय कामकाजाचा लेखाजोखा

पिंपरी : संसदीय कामकाजाला 50 वर्षे पूर्ण करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या कार्याचा लेखाजोखा मिश्किलपणे मांडला. दावणीला बांधल्या जाणाऱ्या बैलाला निदान बैल पोळ्याला तरी सुट्टी असते. तसेच सजवून त्यांची मिरवणूक तरी काढतात. मात्र मला या 50 वर्षात साधी एकही सुट्टी घेता आली नाही, पण माझ्या मिरवणुका भरपूर काढल्या, असं शरद पवार म्हणाले. नोटाबंदीवरुन मोदींवर टीका सत्तेतील खासदार खाजगीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाची खिल्ली उडवतात. मोदी आता प्रॉपर्टी आणि सोन्यावर निर्बंध आणणार आहेत. त्यामुळे ही आमची शेवटची खासदारकी असेल, असंही काही जण म्हणतात, असं सांगत पवारांनी गौप्यस्फोट केला. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित राज्यस्तरीय शिक्षकेत्तर अधिवेशनात ते बोलत होते. देशात कॅशलेस व्यवहार करायला निघालेलं सरकार कॅशलेस व्यवहार सुरक्षित आहे याची हमी देईल का, असा सवालही त्यांनी केला. सामान्य जनतेला पैसे मिळत नसताना करोडो रुपये हे छाप्यात पकडले जातात. या नोटांना पाय कुठून फुटतात, नोटा छपाई करणारे कारखाने, रिझर्व बँक आणि स्टेट बँकेतूनच या नोटा बाहेर पडतायेत का, असे सवालही पवारांनी केले.
आणखी वाचा























