Sushma Andhare vs Shambhuraj Desai : सुषमा अंधारेंना कायदेशीर नोटीस पाठवली, शंभूराज देसाईंचा आक्रमक पवित्रा
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात (Lalti Patil drugs case) शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या आरोपानंतर, उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आक्रमक पवित्रा घेतला
मुंबई : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात (Lalti Patil drugs case) शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या आरोपानंतर, उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुषमा अंधारे यांनी आपली विधाने मागे न घेतल्यामुळे त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे, अशी माहिती शंभूराज देसाईंनी दिली. ते मुंबईत बोलत होते. ललित पाटील ड्रग्जप्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि शंभूराज देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केली होती.
शंभूराज देसाई काय म्हणाले?
सुषमा अंधारे यांनी आरोप केले होते. मी त्यांना म्हंटलं विधान मागे घ्या. त्या म्हणाल्या मी विधान मागे घेणार नाही. मी त्यांना लीगल नोटीस पाठवली आहे. नागपुरात त्यांनी उत्पादन शुल्कासंदर्भात वर्तमान पत्रातील बातम्या त्या दाखवत होत्या.कालही बातम्या त्या दाखवत होत्या .त्याप्रकरणी मी विधान भवनात उत्तर दिलं होतं. त्या चर्चेत काही अधिकाऱ्यांनी नावं नमुद केली आणि आक्षेप नोंदवले. याप्रकरणी मी चौकशी करतो सांगितलं होतं, आणि तशी सुनावणी सुरु आहे. पण अंधारे यांनी बातमी दाखवली यासंदर्भात लक्षवेधी संदर्भात होती. विधान परिषदेच्या कामकाजाचा भाग आहे, मी येणाऱ्या अधिवेशनात ते मांडेल, असं शंभूराज देसाई म्हणाले.
माझी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी
सुषमा अंधारे या ललित पाटील प्रकरणावरुन बदल्यांच्या बातम्यांवर डायव्हर्ट करतायत. मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे आणि जलदगतीनं ही प्रक्रिया व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. सूर्यप्रकाशाएवढं स्पष्ट आहे. अंधारे यांनी काही मंत्र्यांचं नाव घेतलं आणि नंतर माझं नाव घेतलं. त्या हवेत तीर मारण्याचा प्रयत्न करतायत. माझी बाजू सत्याची आहे. माझी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे, असं शंभूराज देसाई म्हणाले.
शिवसेना शहरप्रमुख असताना ललितला अटक
ललित पाटील याला 2020 मध्ये अटक झाली तेव्हा ते शिवसेना शहर प्रमुख होते. 14 दिवस ते रुग्णालयात होते, त्यांची चौकशी झाली नाही. याप्रकरणाची सुरुवात 2020 ला झाली. त्यावेळी कोण गृहमंत्री, मुख्यमंत्री होते? हे सर्वांना माहिती आहे. देवेंद्र फडणवीस साहेब याप्रकरणी चौकशी करतील, असं शंभूराज देसाई म्हणाले.
ज्या पक्षाचा तो शहर अध्यक्ष होता, त्याच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी संबंध येतच असतात, असं म्हणून शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
अंधारे बाई माझी बदनामी करतायत, जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा प्रक्षोभ आहे त्यामुळे मी तातडीनं साताऱ्याला जाणार आहे. कायद्याचा आधार घेत यापुढे मी लढणार आहे, असं म्हणून शंभूराज देसाई यांनी सुषमा अंधारेंना उत्तर दिलं.
एखाद्याला आयुष्यातून उठवणार का?
सुषमा अंधारे यांना धमक्या येत असतील तर त्यांनी पोलिस तक्रार द्यावी. ते त्यांच्या तक्रारीची दखल घेतील. राजकीय मतभेद जरुर असावेत मात्र त्याला काही पातळी असायला हवी. आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न करायचा का? आरोप करतात त्यांनी तारताम्य पाळले पाहिजे. राजकीय विचार वेगळे असतात त्याला अनुसरुन टीका जरुर केली पाहिजे मात्र पातळी सोडली नाही पाहिजे, असं आवाहन शंभूराज देसाईंनी केलं.
शिवसेना शहरप्रमुख असताना ललितला अटक
ललित पाटील याला 2020 मध्येप्रकरणावरुन बदल्यांच्या बातम्यांवर डायव्हर्ट करतायत. मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे आणि जलदगतीनं ही प्रक्रिया व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. सूर्यप्रकाशाएवढं स्पष्ट आहे. अंधारे यांनी काही मंत्र्यांचं नाव घेतलं आणि नंतर माझं नाव घेतलं. त्या हवेत तीर मारण्याचा प्रयत्न करतायत. माझी बाजू सत्याची आहे. माझी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे, असं शंभूराज देसाई म्हणाले.
अटक झाली तेव्हा ते शिवसेना शहर प्रमुख होते. 14 दिवस ते रुग्णालयात होते, त्यांची चौकशी झाली नाही. याप्रकरणाची सुरुवात 2020 ला झाली. त्यावेळी कोण गृहमंत्री, मुख्यमंत्री होते? हे सर्वांना माहिती आहे. देवेंद्र फडणवीस साहेब याप्रकरणी चौकशी करतील, असं शंभूराज देसाई म्हणाले.