एक्स्प्लोर

Shambhuraj Desai : शंभुराज देसाई ज्या खात्याचे राज्यमंत्री होते त्याच खात्याचे आता कॅबिनेट मंत्री झाले! 

उद्धव ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री शंभुराज देसाईंकडे  गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन खात्याचा कारभार होता. आता राज्य उत्पादन शुल्क खातं आलं आहे.

Shambhuraj Desai : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यात अखेर शिंदे सरकारकडून खाते वाटप जाहीर करण्यात आली आहेत. अर्थातच खाते वाटपात फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहिला असून त्यांच्याकडे तब्बल 7 खाती आहेत. दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीची दुय्यम खाती मुख्यमंत्री शिंदे यांच्या पदरात पडली आहेत. आदित्य ठाकरेंची खातीही भाजपनं पळवली आहेत. 

दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्यांमध्ये शंभुराज देसाई आणि अब्दुल सत्तार यांच्याकडे राज्यमंत्रिपदावरून कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळाली होती. उद्धव ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे  गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन खात्याचा कारभार होता. आता त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्काचे कॅबिनेट मंत्रिपद आलं आहे.

दुसरीकडे अब्दुल सत्तार यांच्याकडे अनपेक्षित दादा भुसे यांच्याकडील कृषी खातं देण्यात आलं आहे. दादा भुसेंकडे बंदरे व खनिकर्म देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग त्यांच्याकडे आहेत. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्याकडे तीन खात्यांचा कारभार देण्यात आला असला, तरी त्यांनी काम पाहिलेलं महसूल खातं राधाकृष्ण विखे पाटील यांना मिळाले आहे. चंद्रकांत पाटलांकडे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्रिपदाची जबाबदारी देण्याता आली आहे. महाविकास आघाडीसरकारमध्ये हसन मुश्रीफांनी कारभार पाहिलेल्या ग्रामविकास खात्याचा कारभार गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आला आहे. सांगलीच्या सुरेश खाडे यांच्याकडे कामगार खाते देण्यात आले आहे. 

इतर मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे

  • राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
  • सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
  • चंद्रकांत पाटील-  उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
  • डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास
  • गिरीष महाजन-  ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 
  • गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता 
  • दादा भुसे- बंदरे व खनिकर्म 
  • संजय राठोड-  अन्न व औषध प्रशासन
  • सुरेश खाडे- कामगार
  • संदीपान भुमरे-  रोजगार हमी योजना व फलोत्पादन
  • उदय सामंत- उद्योग
  • प्रा.तानाजी सावंत - सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण
  • रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण
  • अब्दुल सत्तार- कृषी
  • दीपक केसरकर- शालेय शिक्षण व  मराठी भाषा
  • अतुल सावे-  सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
  • शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क
  • मंगलप्रभात लोढा-  पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget