Shambhuraj Desai Profile : वयाच्या 19 व्या वर्षी साखर कारखान्याची जबाबदारी, पश्चिम महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व, शंभुराज देसाई पुन्हा महाराष्ट्राचे मंत्री
Shambhuraj Desai Profile : साताऱ्यातील पाटण मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे शंभुराज देसाई हे आमदार म्हणून निवडून आलेत. आता त्यांनी राज्याच्या मंत्रीपदाची देखील शपथ घेतलीये.
Shambhuraj Desai Profile : अवघ्या काही दिवसांपूर्वी राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर (Maharashtra Assembly Elections 2024) महायुतीमध्ये सत्तास्थापनेची लगबग सुरु झाली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता राज्याच्या मंत्रीमंडळाचा देखील विस्तार होत आहे. अनेक महत्त्वाच्या नेत्यांची नावं या मंत्रीमंडळाच्या यादीमध्ये होती. त्यातच पश्चिम महराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघाचे आमदार शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी देखील दुसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात शंभुराज देसाई यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि राज्य सीमा संरक्षण खात्याची जबाबदारी होती. त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी जाणून घेऊयात.
शंभुराज देसाई यांच्यावर वयाच्या अवघ्या 19 व्या साखर कारखान्याची जबाबदारी आली. 1986 ते 996 लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते. सारख कारखान्यापासून सुरु झालेला शंभुराज देसाई यांचा प्रवास मंत्रालयापर्यंत येऊन पोहचलाय. या त्यांच्या राजकीय कार्यकाळात अनेक चेअरमन, संचालक, साखर कारखान्याचे अध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. त्यामुळे महायुतीच्या सरकारच्या या कार्यकाळात त्यांच्यावर कोणत्या खात्याची जबाबदारी सोपवली जाणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
शंभुराज देसाई यांचा राजकीय प्रवास
जन्म : 17 नोव्हेंबर 1966
शैक्षणिक पात्रता : एस.वाय.बी.कॉम. सामाजिक शैक्षणिक,राजकीय माहिती
1986 ते 1996 : सहकार क्षेत्रात पदार्पण लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि.दौलतनगर ता.पाटण,जि.सातारा चेअरमनपद. वयाच्या 19 व्या वर्षीच चेअरमनपदाची जबाबदारी.
1986 ते 2004 : मार्गदर्शक मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ,मरळी ता.पाटण जि.सातारा सन 1986 ते सन 2004 (18 वर्षे)
अध्यक्ष-लोकनेते बाळासाहेब देसाई फौडेशन दौलतनगर, ता.पाटण,जि.सातारा (सन 1986 पासून)
संचालक-महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि.मुंबई (सन 1986 पासून सन 2005 पर्यंत)
1992 ते 2002 : सदस्य-सातारा जिल्हा परिषद,सातारा
मार्गदर्शक-लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुह दौलतनगर ता.पाटण,जि.सातारा (सन 1997 पासून)
2001 ते 2004 : संचालक बँक ऑफ महाराष्ट्र,पुणे,केंद्र शासन प्रतिनिधी (2 वर्ष)
संस्थापक व मार्गदर्शक - शिवदौलत सहकारी बॅंक लि.मल्हारपेठ ता.पाटण,जि.सातारा (सन 2001 पासून)
2004 ते 2009 : महाराष्ट्र विधानसभा सदस्य-पाटण विधानसभा मतदारसंघ (सन 2004 ते 2009 चे कालावधीमध्ये महामहिम राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे हस्ते महाराष्ट्र विधानसभेती उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्राप्त)
2014 ते 2019 : पाटण मतदारसंघातून पुन्हा आमदार
2019 ते 2024 : पाटण मतदारसंघातून आमदार
2024 : पाटण मतदारसंघातून आमदार
2019 ते 2022 : राज्य मंत्री- गृह(ग्रामीण),वित्त,नियोजन , राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन , महाराष्ट्र राज्य. पालकमंत्री - सातारा,ठाणे,वासिम जिल्हा
तालिका अध्यक्ष- महाराष्ट्र विधानसभेचे तालिका अध्यक्ष म्हणून 2014 ते 2019 या पंचवार्षिकमध्ये चारवेळा निवड
महाराष्ट्र विधीमंडळातील लोकलेखा समिती,सदस्य - सन 2004 ते 2009 व सन 2014 ते 2019 (दहा वर्षे कार्यरत)
पक्षप्रतोद- शिवसेना पक्षाचे विधिमंडळ पक्षप्रतोद. सन 2014 ते 2019 (पाच वर्षे कार्यरत)
कार्यकारिणी सदस्य- राष्ट्रकूल संसदीय मंडळ,महाराष्ट्र शाखा. सन 2014 ते 2019 (पाच वर्षे कार्यरत)
शिवसेनेचे पक्षप्रतोद म्हणून सहभाग- केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालयामार्फत आयोजित विशाखापट्टम येथील 17 व्या अखिल भारतीय प्रतोद परिषदेमध्ये शिवसेनेचे पक्षप्रतोद म्हणून सहभाग
महाराष्ट्र विधिमंडळातील तदर्थ समिती सदस्य- सन 2014 ते 2019 पाच वर्षे कार्यरत
कोषाध्यक्ष-कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती.