एक्स्प्लोर

कामगार नेते, ऊर्जामंत्री ते भाजप प्रदेशाध्यक्ष, आता चंद्रशेखर बावनकुळेंच्या खांद्यावर पुन्हा मंत्रि‍पदाची धुरा 

Chandrashekhar Bawankule Biography : भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात महायुतीला एकहाती सत्ता खेचून आणत दणदणीत विजय मिळवून देत आपला ही विजय निश्चित केला आहे.

Chandrashekhar Bawankule Profile in Marathi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या लँडस्लाईड यशानंतर महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी आज (15 डिसेंबर) नागपुरात पार पडला. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह 20 मंत्रि‍पदे आली आहेत. शिवसेनेच्या वाट्याला एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) 12 मंत्रि‍पदे आली. तर राष्ट्रवादीला अजित पवारांसह 10 खाती मिळाली आहे. 

अशातच  देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर(Nagpur)जिल्ह्यातील  कामठी विधानसभा मतदारसंघातून (Kamthi Vidhan Sabha Constituency) भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एकहाती सत्ता खेचून आणत दणदणीत विजय मिळवला. यासह राज्यात भाजपला जे अभूतपूर्व यश मिळाले त्यात विद्यमान प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. पक्षाची स्थानिक स्थरांपासून ते उच्चपदस्थांपर्यंत असलेला बावनकुळे यांचा असलेला कनेक्ट, संघटन आणि राजकीय कसब या अनुषंगाने त्यांनी पक्षासाठी दमदार कामगिरी केल्याचे निकालातून पुढे आले आहे. 

दरम्यान,भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची कामगिरी लक्षात घेता त्यांचावर पक्षाने आणखी एक जबाबदारी देत राज्याचे ------ मंत्री म्हणून जाहीर केलं आहे. आज त्यांनी देखील आपल्या मंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे. दरम्यान आजवरच्या त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीबाबतची माहिती जाणून घेऊया.

चंद्रशेखर बावनकुळेंच्या खांद्यावर पुन्हा मंत्रि‍पदाची धुरा 

"राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रवासही खडतर आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 6 डिसेंबर 2014 रोजी महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. बावनकुळे हे शेतकरी कुटुंबातील आहेत. एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना विविध सामाजिक चळवळीतून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढा दिला. 1997 मध्ये ते कोराडी मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. 2002 मध्ये ते पुन्हा निवडून आले आणि जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले. 2004 मध्ये त्यांनी प्रथमच काँप्टी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकली. त्यानंतर त्यांनी 2009 आणि 2014 मध्ये ते पुन्हा याच मतदारसंघातून निवडून आले. बावनकुळे हे विविध सामाजिक संस्थांशी सक्रियपणे संलग्न आहेत.

कामगार नेते ते ऊर्जामंत्री, आता नवी जबाबदारी  

*१९९७ -२०२२ जिल्हा परिषद सदस्य

* २००२ -२००४ जिल्हा परिषद सदस्य भाजपा + शिवसेना जि.प. सदस्य गट सदस्य आरोग्य व बांधकाम समिती गटनेता

* २००४ -२००९, २००९ -२०१४, २०१४-२०१९ विधानसभा सदस्य आमदार (विधीमंडळ पंचायत राज, सार्वजनीक उपक्रम व ग्रंथालय समिती सदस्य)

* २०१४- २०१९ महाराष्ट्राचे उर्जा, नविन व नवीकरणीय, राज्य उत्पादन शुल्क मंत्री व नागपूर जिल्हा पालकमंत्री. 

* जानेवारी २०२२ विधान परिषद सदस्य (नागपूर स्थानिक प्राधीकारी संस्था मधून निर्वाचीत)

भारतीय जनता पक्ष स्तरावर ते भारतीय जनता पक्षाचे सक्रीय सदस्य

* १९९५ पासून उपाध्यक्ष नागपूर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा

* १९९९- २००१ नागपूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे महामंत्री

* २००२ -२००४ संघटन प्रमुख भारतीय जनता पक्ष कामठी विधानसभा क्षेत्र

* २०११ ते २०१४ जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा

* २०१४ - २०१७ प्रदेश सचिव महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी

* २०२१ ते २०२२ प्रदेश महामंत्री महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी (महाराष्ट्रातील १६ लोकसभा क्षेत्र प्रवास कार्यक्रम प्रभारी)

* पुढे १२ ऑगस्ट २०२२ पासून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती

इतर सामाजीक कार्य

छत्रपती सेना विद्यार्थी संघटनेत कार्य

* १९८८ - १९९५ अखिल महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त बेरोजगार समिती संस्थापक अध्यक्ष

* कोराडी वीज प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासाठी व पुनर्वसनासाठी सातत्याने लढा व आंदोलने

* विज प्रकल्पग्रस्त आंदोलनात अटक

* अध्यक्ष, श्री जगदंबा लोकसेवा प्रतिष्ठान कोराडी

* अध्यक्ष, महालक्ष्मी जगदंबा बिगर शेती सहकारी संस्था, नांदा- कोराडी

* अध्यक्ष, श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी श्री क्षेत्र व पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्नातून १८५ कोटी रूपयांची अनेक विकास कामें पूर्ण व काही पूर्णत्वाच्या मार्गावर

हे ही वाचा 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रिमंडळात रवी राणांना संधी नाहीच, नवनीत राणांचं स्टेटस व्हायरल; व्हिडिओतून नाराजी उघड
मंत्रिमंडळात रवी राणांना संधी नाहीच, नवनीत राणांचं स्टेटस व्हायरल; व्हिडिओतून नाराजी उघड
Dada Bhuse Profile : रस्त्यावरचा शिवसैनिक ते सलग पाचवेळा आमदार, दादा भुसे पुन्हा एकदा मंत्रि‍पदी विराजमान
रस्त्यावरचा शिवसैनिक ते सलग पाचवेळा आमदार, दादा भुसे पुन्हा एकदा मंत्रि‍पदी विराजमान
Hasan Mushrif Profile : पंचायत समिती सभापती ते कॅबिनेट मंत्री; हसन मुश्रीफांचा मंत्रिपदाचा अन् आमदारकीचा षटकार!
पंचायत समिती सभापती ते कॅबिनेट मंत्री; हसन मुश्रीफांचा मंत्रिपदाचा अन् आमदारकीचा षटकार!
Narendra Bhondekar : मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी, शिवसेनेत पहिला राजीनामा पडला, नरेंद्र भोंडेकरांचा मोठा निर्णय, सेनेतील पदं सोडली
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवसेनेत मोठी घडामोड, आमदार नरेंद्र भोंडेकरांचा मंत्रिपद न मिळाल्यानं मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare : संघटनेच्या मजबुतीला प्राधान्य देण्याचं काम पुढील काळात होईलRavindra Chavan : रविंंद्र चव्हाणांचं मंत्रिमंडळात नाव नसण्याची शक्यताCabinet Expansion : भाजपला 20, राष्ट्रवादीला 10, शिवसेनेला 12 मंत्रिपदं?Fadnavis Gadkari Banner Nagpur : गडकरी- फडणवीसांचं एकमेकांना अलिंगन; मोठं कटआऊट झळकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्रिमंडळात रवी राणांना संधी नाहीच, नवनीत राणांचं स्टेटस व्हायरल; व्हिडिओतून नाराजी उघड
मंत्रिमंडळात रवी राणांना संधी नाहीच, नवनीत राणांचं स्टेटस व्हायरल; व्हिडिओतून नाराजी उघड
Dada Bhuse Profile : रस्त्यावरचा शिवसैनिक ते सलग पाचवेळा आमदार, दादा भुसे पुन्हा एकदा मंत्रि‍पदी विराजमान
रस्त्यावरचा शिवसैनिक ते सलग पाचवेळा आमदार, दादा भुसे पुन्हा एकदा मंत्रि‍पदी विराजमान
Hasan Mushrif Profile : पंचायत समिती सभापती ते कॅबिनेट मंत्री; हसन मुश्रीफांचा मंत्रिपदाचा अन् आमदारकीचा षटकार!
पंचायत समिती सभापती ते कॅबिनेट मंत्री; हसन मुश्रीफांचा मंत्रिपदाचा अन् आमदारकीचा षटकार!
Narendra Bhondekar : मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी, शिवसेनेत पहिला राजीनामा पडला, नरेंद्र भोंडेकरांचा मोठा निर्णय, सेनेतील पदं सोडली
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवसेनेत मोठी घडामोड, आमदार नरेंद्र भोंडेकरांचा मंत्रिपद न मिळाल्यानं मोठा निर्णय
Arvind Kejriwal : महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होत असताना अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, मुख्यमंत्र्यांबाबत मोठा निर्णय
नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सर्व उमेदवार जाहीर, मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ ठरला
Devendra Fadnavis Cabinet Minister List : तब्बल 33 वर्षांनंतर राज्याच्या उपराजधानीत मंत्रिमंडळ विस्तार अन् शपथविधी; 19 आमदारांना पहिल्यांदाच मंत्रीपदाचा कोट!
तब्बल 33 वर्षांनंतर राज्याच्या उपराजधानीत मंत्रिमंडळ विस्तार अन् शपथविधी; 19 आमदारांना पहिल्यांदाच मंत्रीपदाचा कोट!
Maharashtra Cabinet Expansion: मोठी बातमी! नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला नाही, महायुतीत रामदास आठवले नाराज, आरपीआयला मंत्रीमंडळात संधी नाही
फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला नाही, महायुतीत रामदास आठवले नाराज, आरपीआयला मंत्रीमंडळात संधी नाही
Embed widget