एक्स्प्लोर

सीरममधील आगीत एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान, अदर पुनावालांची माहिती

Pune Serum Institute Fire : सीरम इन्स्टिट्यूटमध्ये काल लागलेल्या आगीत एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झालं असल्याची माहिती सीरमचे सर्वेसर्वा अदर पूनावाला यांनी दिली आहे. तसेच खासकरुन सप्लायवर परिणाम झाला असल्याचं अदर पुनावाला यांनी सांगितलं आहे.

Pune Serum Institute Fire : सीरम इन्स्टिट्यूटमध्ये काल लागलेल्या आगीत एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झालं असल्याची माहिती सीरमचे सर्वेसर्वा अदर पूनावाला यांनी दिली आहे. तसेच खासकरुन सप्लायवर परिणाम झाला असल्याचं अदर पुनावाला यांनी सांगितलं आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीरमच्या आग लागलेल्या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अदर पूनावालांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीरम इन्स्टिट्यूटच्या घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खा. गिरीश बापट, आ. चेतन तुपे, सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी शेवटी कोव्हीशील्ड लस बनवली जाते त्या प्लांटची देखील पाहणी केली.

Serum Institute Fire : सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीसंदर्भात अदर पुनावालांचं ट्वीट, म्हणाले...

आदर पुनवाला म्हणाले, एक हजार कोटी रुयांपेक्षा अधिक नुकसान कालच्या आगीमुळे झाले आहे. या आगीत बीसीजी आणि अन्य औषधांचे नुकसान झाले आहे. कोव्हीशील्ड पुर्णपणे सुरक्षित असून त्याच्या निर्मिती प्रक्रियेवर कोणताच परिणाम होणार नाही, असं देखील अदर पूनावालांनी म्हटलंय.

Serum Institute Fire : केंद्रीय तपास यंत्रणेनं आगीचा अहवाल मागवला

घातपात की अपघात अहवाल आल्यावर कळेल- मुख्यमंत्री देशाला कोरोना लस पुरविणाऱ्या सीरम इन्स्टीट्यूटला आग लागल्याची बातमी लागल्याचे कळताच काळजाचा ठोका चुकला. दुर्घटना घडली तेथील दोन मजले वापरात होते. तिसऱ्या मजल्याचे काम सुरू आहे. कोव्हीडची लस जिथे बनवली जाते त्या विभागाला आगीचा फटका बसला नाही. प्लांट पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आगीमागे घातपात असल्याची शक्यता काही लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. त्यामुळे खरंच असं झालं का याचा तपास केला जाईल. अहवाल येईपर्यंत निष्कर्ष काढू नका. आगीचा कोणताही परिणाम लसीकरणावर होणार नाही.

Serum Institute fire : कोविशिल्ड लसीचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आगीत पाच जणांचा मृत्यू सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मांजरी भागातील सीरम इन्स्टिट्यूटचा हा नवीन प्लांट आहे. सीरमच्या BCG लस बनवण्याच्या इमारतीला काल दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. ज्या ठिकाणी बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी ही आग लागली.

आगीत मृत्युमुखी पडलेले कामगार प्रतिक पाष्टे - डेक्कन, पुणे महेंद्र इंगळे - नऱ्हे, पुणे रमा शंकर हरिजन - यूपी बिपीन सरोज - यूपी सुशील कुमार पांडे - बिहार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget