Serum Institute Fire : केंद्रीय तपास यंत्रणेनं आगीचा अहवाल मागवला
सीरम इन्स्टिट्युटमधील आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र इमारतीच्या काही मजल्यांचं नुकसान झालं आहे.
पुणे : कोरोना लस तयार होत असलेल्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये भीषण आग लागली आहे. आग कशी लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कोरोना आणि इतर लसींची निर्मिती याठिकाणी होत असल्यान या आगीची दखल केंद्र सरकारनेही घेतली आहे. केंद्रीय यंत्रणा याबाबत सतर्क असून केंद्रीय तपास यंत्रणेनं या आगीचा अहवाल मागवला आहे.
दुपारी 1 वाजेच्या सुमारास ही आग आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झालेली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र इमारतीच्या काही मजल्यांचं नुकसान झालं आहे.
Serum Institute Fire : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला आग
कोरोना लस सुरक्षित
कोरोनाची लस सुरक्षित आहे, कारण सीरमच्या BCG लस बनवण्याच्या इमारतीला आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागण्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना तातडीने आग नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या. राज्याच्या यंत्रणेला देखील निर्देश दिले असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आग संपूर्णपणे विझवण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान वेळेत पोहचले आहेत. त्यांनी सुरू केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांबाबत समाधान व्यक्त केले आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटला लागलेल्या आगीचे वृत्त समजताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील संसद सदस्यांच्या समवेत सुरू असलेल्या बैठकीतूनच या घटनेची दखल घेतली व तातडीने कृती करण्याच्या सूचना दिल्या.