Chandrayan 3 quick heal : चांद्रयान मोहिमेत मराठमोळ्या 'Quick Heal'चा मोलाचा वाटा, Quick Heal'ने नेमकं काय केलं?
चांद्रयान 3 मोहिमेत पुण्यातील क्विकहील टेक्नॉलॉजी आणि सेक्यूराईट यांचा मोलाचा वाटा होता. क्विकहील टेक्नॉलॉजी यांच्या सेक्युराईत या कंपनीचा सायबर सुरक्षा भागीदार म्हणून मोलाचा वाटा होता.
![Chandrayan 3 quick heal : चांद्रयान मोहिमेत मराठमोळ्या 'Quick Heal'चा मोलाचा वाटा, Quick Heal'ने नेमकं काय केलं? SEQRITE Celebrates ISROs Historic Chandrayaan 3 Milestone as Trusted Cybersecurity Partner Chandrayan 3 quick heal : चांद्रयान मोहिमेत मराठमोळ्या 'Quick Heal'चा मोलाचा वाटा, Quick Heal'ने नेमकं काय केलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/25/5de7246551fd21c6fbe473938dc799cd1692964157819442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : इस्रोची चांद्रयान 3 (chandrayan-3) मोहीम यशस्वी झाली. चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरणारा भारत हा जगात पहिला देश ठरला. शेकडो लोकांची मेहनत आणि जिद्दीमुळे भारतानं हे शक्य करुन दाखवलं. मात्र मोहिमेत पुण्यातील क्विकहील टेक्नॉलॉजी आणि सेक्यूराईट यांचा मोलाचा वाटा होता. क्विकहील (Quick Heal) टेक्नॉलॉजी यांच्या सेक्युराईट या कंपनीचा सायबर सुरक्षा (Cyber Security) भागीदार म्हणून इस्रोच्या ऐतिहासिक चांद्रयान-3 मोहिमेत मोलाचा वाटा होता.
क्विकहील (Quick Heal) आणि त्यांचा SEQRITE एंटरप्राइझ विभाग यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सोबत दीर्घकाळ भागीदारी आहे. भारतातील अनेक मोठ्या सरकारी संस्थांसाठी कंपनीने त्यांच्या सर्वसमावेशक सुरक्षा उपायांद्वारे महत्त्वपूर्ण डिजिटल पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
गेल्या 10 वर्षांपासून ISRO त्यांच्या डिजिटल Assets चे संरक्षण करण्यासाठी क्विकहील आणि त्याचा विभाग, SEQRITE च्या प्रगत सायबर सुरक्षा उपायांवर अवलंबून आहे. देशभरात चांद्रयान-3 मोहिमेसाठी SEQRITE च्या एंडपॉईंट प्रोटेक्शन सूट (EPS) चा वापर करण्यात आला. सेक्युराईट कंपनी डोमेन एक्सपर्टीज, पेटेंट टेक्नॉलॉजी, ग्लोबल सर्टिफिकेट यामुळे अनेक सरकारी संस्थांसाठी डिजिटल संरक्षण करण्यासाठी ओळखली जाते.
आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट...
"आमच्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही इस्रोसाठी काम करतो आणि चांद्रयान सारख्या मोहिमेमध्ये आम्ही सहभागी होऊ शकलो, आमच्यावर देखील मोठी जबाबदारी होती त्यामुळे मोहीम यशस्वी झाल्यावर आम्हाला देखील तितकाच आनंद झाला आणि अभिमान वाटला इस्रो आणि देशाचा" अशी भावना क्विकहीलचे जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर संजय काटकर यांनी व्यक्त केली.
SEQRITE नेमकं काय आहे?
SEQRITE ही जागतिक सायबर सुरक्षा ब्रँड, Quick Heal Technologies ची एंटरप्राइझ विभाग आहे. जी जगभरातील व्यवसाय आणि उपक्रमांना सायबर धोका आणि त्यांच्या सुरक्षेसाठी काम करते.सतत नवीन आणि सायबर सुधारणांवर लक्ष ठेवते. SEQRITE नवीन धोक्यांपासून व्यवसायांचे संरक्षण करण्यासाठी एंडपॉईंट सुरक्षा, मोबाइल डिव्हाइस व्यवस्थापन, ईमेल सुरक्षा आणि नेटवर्क सुरक्षा यासह अनेक उत्पादने आणि सर्विस देते. SEQRITE ची भारत, मध्य पूर्व, आफ्रिका आणि आग्नेय आशियासह अनेक प्रमुख बाजारपेठांमध्ये जोमात काम करते आणि सर्वसमावेशक सायबर सुरक्षा उपायांचा विश्वासार्ह प्रदाता म्हणून स्वतःची स्थापना केली आहे. सध्या अनेक सायबर सेक्युरिटीचे धोके निर्माण झाले आहेत. जगात अनेकांना गंडेदेखील घातले जात आहेत. याच धोक्यांपासून आपल्या ग्राहकांना सुरक्षित ठेवण्यासाठी SEQRITE काम करते.
इतर महत्वाची बातमी-
Chandrayan 3 : शाब्बास पोरी नाव काढलसं! चांद्रयान मोहिमेत नांदेडच्या तनुजा पत्की यांचा सहभाग
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)