धक्कादायक! जेष्ठ साहित्यिकावर भीक मागण्याची वेळ, एम. जे. भगत पंढरपूरमध्ये दयनीय अवस्थेत आढळले
पंढरपूर : जेष्ठ साहित्यिक एम. जे. भगत पंढरपूरमध्ये भीक मागताना निराधार आणि दयनीय अवस्थेत आढळून आले.
पंढरपूर : जेष्ठ साहित्यिक एम. जी. भगत पंढरपूरमध्ये भीक मागताना निराधार आणि दयनीय अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने रात्री सोलापूर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. भगत यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे. भगत रात्रीच्या वेळी रस्त्यावर दयनीय अवस्थेत आढळले. त्यांना पूर्ण शुद्ध नव्हती. एका ज्येष्ठ साहित्यिकाची अशी अवस्था होणे, हे फार धक्कादायक आहे.
पंढरपूरमध्ये भक्ती मार्ग परिसरात गुरुवारी एक भिक मागणारी व्यक्ती आजूबाजूच्या लोकांकडे मदतीसाठी याचना करताना पाहायला मिळाली. विशेष म्हणजे ही व्यक्ती इंग्रजी भाषेत मदत मागत होती. यामुळे तेथील लोक आश्चर्यचकीत झाले. याची माहिती मिळताच काही समाजसेवक तेथे पोहोचले. तेही त्या व्यक्तीचं संभाषण ऐकून काही काळ गोंधळले. त्यानंतर व्यक्तीची अधिक विचारपूस केली असता भगत यांची ओळख पटली. त्या व्यक्तीचे शब्द होते, "Will you please arrange me 50 rupees? I will pay back.', 'मला एक टॉवेल खरेदी करायचा आहे की जेणेकरून मी आंघोळ करू शकेल.'
भगत यांनी सांगितले की, 'मी वर्ध्याचा रहिवासी आहे. पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी रेल्वेने निघालो होतो. प्रवासावेळी मोबाईल, सामान आणि पैसे गायब झाले, काही कळले नाही. माझ्या हातापायाला दुखापत झाली आहे. मला हालचाल करता येत नाहीय. तीन दिवस मी रेल्वे स्टेशन बाहेरील रस्त्यावर पडून आहे.'
भगत यांनी पुढे सांगितले की, माझी शुद्धी हरपते. लोक मला भिकारी समजून अन्न, पाणी देतात. मात्र, त्यांना काही सांगण्याइतका त्राणही माझ्यात नव्हता. एका ज्येष्ठ साहित्यिकाची अशी अवस्था होणे, हे फार धक्कादायक आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Share Market : पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकाला दिवशी सेन्सेक्स 1000ने वधारला, निफ्टी देखील 321 अंकांनी वर
- Goa Election Results 2022: भाजपचे बंडखोर उत्पल पर्रिकर यांचा पराभव
- UP Election Result 2022 Live Updates : उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखणार? निवडणुकांचे अचूक अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha