एक्स्प्लोर

मुंबईत 24 जानेवारी तर पुणे, औरंगाबादमध्ये परिस्थिती पाहून शाळा सुरू करणार; स्थानिक प्रशासनाचा निर्णय

पुणे शहर आणि औरंगाबादमधील शाळा या येत्या सोमवारपासून सुरू होणार नसल्याची माहिती तिथल्या स्थानिक प्रशासनाने दिली आहे. 

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू करणार असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. पण सोमवारपासून नव्हे तर 24 जानेवारीपासून मुंबईतील शाळा सुरू होणार आहेत. तर पुणे आणि औरंगाबादमधील शाळा या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असं स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केलंय. 

चर्चा करुन निर्णय घेणार
पुणे शहरात कोरोना संसर्ग वाढत असताना 24 तारखेपासून शाळा सुरू कराव्या अस वाटत नाही. आम्ही अजून द्विधा मनस्थितीत आहोत अशी प्रतिक्रिया पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलीय. पालक संघटना आणि बालरोग तज्ञांशी चर्चा करुन शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊ असंही ते म्हणाले.

सध्या पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना लहान मुले बाधित होण्याचं प्रमाण साडेचार-पाच टक्क्यांवर गेलं आहे. गेल्या एका महिन्यात जवळपास साडे तीन हजार मुलं कोरोना पॉझिटिव्ह झाली असून अजूनही 64 मुलं ही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलीय.

मराठवाडा तसेच औरंगाबादमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने सोमवारपासून शाळा सुरू होणार नसल्याची माहिती औरंगाबादच्या प्रशासनाने दिली आहे. येत्या आठवड्याभरात परिस्थिती पाहून शाळा  कधी सुरू करायच्या याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 

राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू
राज्यातील पहिली ते बारावीच्या शाळांबरोबरच, पूर्व प्राथमिक अर्थात शिशु वर्गही येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळं बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परवानगी दिल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय. शाळा सुरु करण्यासाठी एबीपी माझाच्या मोहिमेला मिळालेलं हे मोठं यश आहे. दरम्यान शाळा सुरु करण्यासंदर्भातले सर्व अधिकार हे स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसंच पालकांच्या संमतीनंतर विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार आहे. 

मुंबईत 24 जानेवारीपासून शाळा सुरू
मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, "मुंबईतही शाळा सुरू करण्यासाठी मुंबई महापालिका सकारात्मक आहे.  मुंबईतल्या शाळा 24 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे.  मुंबईत ऑफलाईन बरोबरच ऑनलाईन शाळाही सुरू राहणार आहे. राज्यातील शाळा सोमवारवारपासून सुरू होणार असल्या तरी पालिकेला मात्र शाळा सुरू करण्यासाठी तीन चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. मागील वेळी जारी केलेले नियम यावेळीही शाळा सुरू ठेवण्यासाठी लागू राहणार आहे.ठ

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि त्यापासून लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता राज्यातील शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. त्यानंतर आता राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटत असून त्याचा प्रभावही कमी झाला आहे. त्यामुळे आता शाळा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी विविध घटकांतून केली जात होती.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget