एक्स्प्लोर

Satej Patil : सतेज पाटलांचा झंझावात, कोल्हापूर भाजपमुक्त! 2015 पासून एकही पराभव नाही

Satej Patil News : 2014 पासून काँग्रेसचा कठीण काळ सुरू झाला तेव्हापासून कोल्हापुरात मात्र प्रत्येक निवडणूक सतेज पाटील निग्रहाने जिंकत आलेत. त्यांच्या विजयात सातत्य दिसतंय.

कोल्हापूर : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मैदानात उतरलेल्या काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी मोठा विजय मिळवला. जयश्री जाधव यांनी भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांचा जवळपास 18 हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. या निवडणुकीत दोन्ही बाजूंकडून दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि काँग्रेसकडून पालकमंत्री सतेज पाटील हे आमने-सामने होते. 2019 प्रमाणे या निवडणुकीतही सतेज पाटील यांचं वर्चस्व दिसून आलं. सतेज पाटील यांनी 2019 मध्ये आधी भाजपमुक्त कोल्हापूर केलं. त्यानंतर आता पोटनिवडणुकीतही सतेज पाटलांनी भाजपला कोल्हापुरात घुसू दिलं नाही. 2014 पासून काँग्रेसचा कठीण काळ सुरु झाला, मात्र सतेज पाटील यांनी त्यांच्या जिल्ह्यात काँग्रेसचा गुलाल कायमच उधळला. 

2014 पासून काँग्रेसचा कठीण काळ सुरू झाला तेव्हापासून कोल्हापुरात मात्र प्रत्येक निवडणूक सतेज पाटील निग्रहाने जिंकत आलेत. त्यांच्या विजयात सातत्य दिसतंय. अन्य महापालिका काँग्रेसने गमावल्या असताना, सतेज पाटलांच्या नेतृत्त्वात काँग्रेस-राष्ट्रवादीने महापालिकेवर झेंडा फडकवला.याशिवाय 2019 च्या निवडणुकीत जिल्ह्यातील 10 पैकी 4 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला, तर राष्ट्रवादीने 2 जागा जिंकल्या. ज्या जिल्ह्यात दोन्ही जागांवर शिवसेनेचे खासदार आहेत, त्याच जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने 2019 मध्ये शिवसेना-भाजपचे सर्व उमेदवार पाडले, केवळ प्रकाश आबिटकर यांना शिवसेनेच्या तिकिटावर जिंकता आलं. 

सतेज पाटील यांचा झंझावात मग पुढेही सुरु राहिला. पुणे शिक्षक आमदार निवडणुकीत, तुम्ही फक्त उमेदवार द्या, निवडून आणायची जबाबदारी माझी असा शब्द सतेज पाटील यांनी काँग्रेस श्रेष्ठींना दिला होता. त्यानुसार काँग्रेसचे प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी करुन, सतेज पाटील यांनी आपला दबदबा कायम राखला होता. 

सतेज पाटील यांचा झंझावात 

2015- कोल्हापूर महापालिकेत विजय
2019 - जिल्हाध्यक्ष म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे 4 आमदार विजयी
2020 - पुणे शिक्षक आमदार निवडणूक विजय
2021 - कोल्हापूर विधानपरिषद बिनविरोध
2021 - गोकुळ दूध संघ पॅनल विजयी
2022 - कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक

लोकसभा निवडणुकीत 'आमचं ठरलंय'

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक सतेज पाटील यांच्या आमचं ठरलंय या घोषणेनं गाजली होती. सतेज पाटील यांनी तत्कालिन राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना थेट विरोध केला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मदत करुनही महाडिकांनी विधानसभा निवडणुकीत घात केल्याचा आरोप सतेज पाटलांचा होता. त्याचाच वचपा सतेज पाटलांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काढला. त्यांनी धनंजय महाडिकांविरोधात प्रचार करुन, शिवसेना उमेदवार संजय मंडलिक यांना मदत केली. त्यावेळी आमचं ठरलंय असा नारा दिला आणि धनंजय महाडिक यांचा पराभव केला. 

मग विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात भाजपचे अमल महाडिक यांच्याविरोधात काँग्रेसकडून पुतण्या ऋतुराज पाटील यांना तिकीट दिलं. ऋतुराज पाटील विजय झाले आणि दुसरे महाडिक हरले. त्यानंतर 2021 मध्ये कोल्हापूर विधानपरिषद बिनविरोध केली. 

पन्नाशी पार, तरीही राज्यमंत्रीच!
सतेज पाटील हे काँग्रेसचा विजयाचा वारु उधळत असले, तरीही त्यांना काँग्रेसकडून राज्यमंत्रीपदच दिलं गेलं. 2009 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आल्यानंतर ते गृहराज्यमंत्री होते, त्यानंतर आता 2019 मध्ये महाविकास आघाडी आल्यानंतर काँग्रेसने त्यांना प्रमोशन न देता राज्यमंत्रीपदच दिलं. एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरुनच टोला लगावला होता. सतेज पाटलांनी वयाची पन्नाशी पार केली, तरी राज्यमंत्रीच आहेत, असं अजित पवार म्हणाले होते.  आता कोल्हापूरच्या विजयानंतर तरी सतेज पाटील यांना काँग्रेस प्रमोशन देतं का हे पाहावं लागेल.

कोल्हापूर जिल्हा 2019 विधानसभा निकाल 

कोल्हापूर दक्षिण - ऋतुराज पाटील (काँग्रेस)
कोल्हापूर उत्तर - चंद्रकांत जाधव (काँग्रेस)
करवीर - पी एन पाटील (काँग्रेस)
हातकणंगले - राजीव आवळे (काँग्रेस)
कागल - हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) 
चंदगड - राजेश पाटील (राष्ट्रवादी) 
शिरोळ - राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष)
राधानगरी -  प्रकाश आबिटकर (शिवसेना)
शाहूवाडी- विनय कोरे (जनसुराज्य)
इचलकरंजी -  प्रकाश आवाडे (अपक्ष)

संबंधित बातम्या

Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय

Kolhapur North By Election Results 2022 : जयश्री जाधव कोल्हापुरातील पहिल्या महिला आमदार, सत्यजीत कदम यांचा पराभव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025Hindenburg Research | हिंडेनबर्गचं पॅकअप, अदानींचे शेअर वधारले, भारतावर काय परिणाम? Special ReportSupriya Sule VS Ajit Pawar | काका पुतणे बसले लांब, ताई-दादांचीही टाळाटाळ Special ReportRajkiya Shole on Saif ali Khan| सैफ अली खानवर हल्ला, विरोधकांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Embed widget