एक्स्प्लोर

Jayashree Jadhav : कोल्हापूर जिंकल्यावर चंद्रकांत अण्णांच्या आठवणीत जयश्री जाधव भावूक; म्हणाल्या...

Kolhapur North By Election Results 2022 : कोल्हापुरातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे. विजयानंतर त्या नेमकं काय म्हणाल्या...

Kolhapur North By Election Results 2022 Jayshree Jadhav Win  : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव करत विधानसभा गाठली आहे. या विजयानंतर जयश्री जाधव या स्व. चंद्रकांत जाधवांच्या आठवणीनं भावूक झाल्या. त्यांनी म्हटलं की, कोल्हापूरच्या जनतेनं आपला शब्द पाळला आहे. अण्णांच्या मागे माझी जबाबदारी घेतली होती ती पूर्ण केली. महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि माझी स्वाभिमानी जनता दोघांनी आपला शब्द पूर्ण केला. हा विजय महाविकास आघाडीचा आणि स्वाभिमानी जनतेचा आहे,असं त्या म्हणाल्या. 

जयश्री जाधव म्हणाल्या की, विजयाची अपेक्षा होतीच. आम्हाला मताधिक्य मिळणार हे माहितच होतं. आपलं कोल्हापूर पुरोगामी विचारांचं आहे. चंद्रकांत दादांचा विषय फोल ठरला आहे. जनतेची सेवा करायला मिळतेय याचा आनंद आहे. मला अण्णांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. माझ्यासोबत अण्णांचा आशिर्वाद आहे. अण्णा तळागाळापर्यंत पोहोचले होते. त्या जनतेचं हे प्रेम आहे. नियतीच्या मनात वेगळं होतं. ही पोटनिवडणूक लागायला नाही पाहिजे होती. चंद्रकांत दादांनी मोठेपणा दाखवायला हवा होता. माझं स्वप्न आहे की अण्णांचं राहिलेलं काम पूर्ण करेन, असंही जयश्री जाधव म्हणाल्या.

कोल्हापुरातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान

कोल्हापुरातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे. तर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं. एकूण 26 फेऱ्यांमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. जयश्री जाधव पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. मधल्या काही फेऱ्या वगळता त्यांनी आपली आघाडी कायम राखली. अखेर त्यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला. 

काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांनी निवडणूक लढवली तर भाजपकडून सत्यजीत कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज्यात एकच पोटनिवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी प्रचाराचा सर्वोच्च बिंदू गाठला. राज्यातील जवळपास सर्व नेत्यांनी कोल्हापुरात येऊन प्रचार केला. त्यामुळे निकालाची उत्सुकता होती. 

यानिवडणुकीत काँग्रेससह भाजपच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपली ताकद पणाला लावली होती. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही अनेक दिवसांपासून कोल्हापुरात ठाण मांडलं होतं. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही इथे प्रचार केला होता. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या प्रचारामध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. 

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचा गेल्या तीन निवडणुकीतील आढावा

- 2009 साली छत्रपती मालोजीराजे यांचा पराभव करुन शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे पहिल्यांदा आमदार बनले 

- राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा 3687 मतांनी पराभव केला

- 2014 साली पुन्हा राजेश क्षीरसागर हे 22421 मताधिक्य घेऊन दुसऱ्यांना आमदार झाले

- त्यावेळी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले सत्यजित कदम दुसऱ्या क्रमांकावर होते

- तर 2019 साली राजेश क्षीरसागर यांचा 15199 मतांनी पराभव करुन काँग्रेसचे चंद्रकांत जाधव आमदार बनले होते

संबंधित बातम्या

Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय

Kolhapur North By Election Results 2022 : जयश्री जाधव कोल्हापुरातील पहिल्या महिला आमदार, सत्यजीत कदम यांचा पराभव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Car Accident Rap Song : पैसे मेरे बाप के...दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचं रॅप साँगPune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
Embed widget