एक्स्प्लोर

पाटणमधील आंबेघर गावात काल भूस्खलन, 16 बेपत्ता, अखेर आज एनडीआरएफची टीम पोहोचली, बचावकार्य सुरु

Satara Rain Update  : पाटण तालुक्यातील आंबेघर गावामध्ये  एनडीआरएफची टीम काही वेळा पूर्वी पोहोचली आहे. आता बचावकार्य सुरु झालं आहे. आंबेघरमधे भुस्खलन होऊन 16 लोक कालपासून बेपत्ता आहेत.  

Satara Rain Update  : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आंबेघर गावामध्ये  एनडीआरएफची टीम काही वेळा पूर्वी पोहोचली आहे. आंबेघरमधे भुस्खलन होऊन 16 लोक कालपासून बेपत्ता आहेत. याठिकाणी पोहोचणं फार कठिण असल्यानं कालपासून कुणीही इथं पोहोचू शकलं नाही. आज सकाळपासून एन डी आर एफ ची टीम आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुन्हा बोटींच्या सहाय्याने आंबेघरमधे जाण्याचा प्रयत्न केला. अखेर दुपारच्या सुमारास एनडीआरएफसह सरकारी अधिकाऱ्यांची टीम आंबेघरमध्ये पोहोचली. सध्या बचावकार्य वेगाने सुरु आहे. 

आंबेघरमध्ये बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरु आहे. इथं जेसीबी, पोकलेन अशी वाहनं पोहोचू शकलेली नाहीत त्यामुळं एनडीआरएफला हातानेच मदतकार्य करावं लागत आहे. काही लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अजूनही काही बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे. 

कराडमधील प्रिती संगमावरील यशवंतराव चव्हाणांचे स्मृतीस्थळाला अजूनही पाण्याचा वेढा आहे. आता स्मृतीस्थळ पूर्णपणे पाण्यात गेलं आहे. पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंदच आहे. पावसाने मध्यरात्रीनंतर काहीशी उघडीप दिली होती. मात्र पहाटेपासुन पुन्हा पाऊस सुरु झालाय.  कोयना धरणातून 53 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून कालपासून त्यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही. 

Raigad Talai Update : मोठी दुर्घटना! रायगड जिल्ह्यातील तळीये गावावर दरड कोसळून जवळपास 32 जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

आंबेघर गावात बेपत्ता असलेल्या 16 जणांसाठी शोधमोहीम थोड्या वेळात सुरु होत आहे. एनडीआरएफची टीम आणि प्रशासकीय अधिकारी चालत आंबेगरमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. कारण मध्ये असलेल्या धरणाच्या पाण्यामधे मोठ्या प्रमाणात झाडे असल्याने बोट पंक्चर होण्याचा धोका आहे. आता चालत हे गाव गाठण्यास काही तासांचा अवधी लागणार आहे.  

 महाराष्ट्राच्या स्थितीवर केंद्राचे सातत्याने लक्ष, देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहराज्यमंत्री, मुख्यमंत्र्यांशी चर्चा

सातारा जिल्ह्यातील कोंडावळे गावात माळीण सारखी मोठी दुर्घटना 
सातारा जिल्ह्यातील कोंडावळे या गावात माळीण सारखी मोठी दुर्घटना काल सायंकाळी घडली. या दुर्घटनेत जवळपास पंचवीस घरं गाडली गेली आहेत. डोंगर तुटल्याचे आणि गावाकडे सरकत येत असल्याचे मोठे आवाज काही ग्रामस्थांना दिसले आणि ही ग्रामस्थ मंडळी घरातून बाहेर पळत सुटली. यामुळं अनेक लोकं या मोठ्या दुर्घटनेतून वाचली. या दुर्घटनेत जवळपास 25 घरं गाडली गेली तर 27 लोक बाहेर काढली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

 Raigad Landslide Deaths: रायगड तळीये दुर्घटना; पंतप्रधानांकडून मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना मदत जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget