एक्स्प्लोर
दरोड्याच्या आरोपीचा मृत्यू, 12 निलंबित पोलिसांवर हत्येचा गुन्हा
![दरोड्याच्या आरोपीचा मृत्यू, 12 निलंबित पोलिसांवर हत्येचा गुन्हा Satara Fir Against 12 Suspended Police For Death Of Alleged दरोड्याच्या आरोपीचा मृत्यू, 12 निलंबित पोलिसांवर हत्येचा गुन्हा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/20074210/Karad-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सातारा : कराड पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी 12 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे निलंबित पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलेल्या रावसाहेब जाधव यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी डायरीत आरोपीची नोंद न घेतल्यानं पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे.
निलंबित पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक विकास धस आणि सहाय्यक पोलिस निरिक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह आणखी 10 हवालदारांना निलंबित करण्यात आलंय.
बंगळुरु महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स गाडीवर दरोडा टाकल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने दोन जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यामध्ये रावसाहेब जाधव यांचा समावेश होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)