Santosh Deshmukh Ambulance Root : संतोष देशमुख यांचा मृतदेह नेणाऱ्या रुग्णवाहिकेचा प्रवास कसा झाला? समोर आली महत्त्वाची बातमी
संतोष देशमुख यांचा मृतदेह घेऊन ही रुग्णवाहिका कुठे जाणार आणि ती कुठे वळवण्यात आली? रुग्णवाहिकेचा प्रवास कसा झाला? काय काय झालं याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

Santosh Deshmukh Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेगळेच वळण देण्याचा कट खुद्द बीड पोलिसांनीच रचल्याचा धक्कादायक आरोप मस्साजोगचे ग्रामस्थ करतायत.संतोष देशमुख यांची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचं दाखवण्यासाठी कळंबच्या दिशेने अँम्ब्युलन्स वळवल्याचा आरोप हेातोय.कळंबमध्ये एका महिलेच्या घरी मृतदेह न्यायचे आणि ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचं दाखवण्याचा पोलिसांचा कट होता असा आरोप धनंजय देशमुखांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली. (Santosh Deshmukh Case) संतोष देशमुख यांचा मृतदेह घेऊन ही रुग्णवाहिका कुठे जाणार आणि ती कुठे वळवण्यात आली? रुग्णवाहिकेचा प्रवास कसा झाला? काय काय झालं याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे...पाहूया..
ग्रामस्थांचा आरोप काय?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेगळंच वळण देण्याचा कट खुद्द बीड पोलिसांनीच रचला होता, संतोष देशमुखांची हत्या ही अनैतिक संबंधातून झाल्याचं दाखवण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी कळंबमध्ये एक बाईही तयार ठेवण्यात आली होती असा आरोप धनंजय देशमुखांनी केला आहे. गावकऱ्यांच्या जागरुकतेमुळे पोलिसांचा हा कट उधळून लावण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी आपली दिशाभूल केल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला.
विशेष म्हणजे, भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत हा मुद्दा पहिल्यांदा मांडताना या प्रकरणाचा उल्लेख केला होता. कळंबमध्ये एक महिला तयार ठेऊन संतोष देशमुखांना बदनाम करण्याचा कट होता असा आरोप त्यांनी केला होता. आता तेच प्रकरण स्पष्टपणे उघड झालं आहे. कळंबमध्ये एका महिलेच्या घरी मृतदेह न्यायचे आणि ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचं दाखवण्याचा पोलिसांचा कट होता असा आरोप धनंजय देशमुखांनी केला.
ॲम्ब्यूलन्सचा प्रवास कसा झाला?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मस्साजोग गावापासून 7 किमी अंतरावर संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला हेाता.हा मृतदेह पोलीस व्हॅनमधून तिथे आणला गेला. सहा ते सात किमीपर्यंत संतोष देशमुख यांचा मृतदेह आणल्यानंतर चिंचोलीवरून केज शहराकडे जाणं अपेक्षीत असताना कळंबच्या दिशेने गेली असं गावकऱ्यांचे म्हणणं आहे. या कारसोबतच मस्साजोगच्या ग्रामस्थांची एक गाडी दिसल्यानं पोलिसांनी 200 मीटरवरून गाडी फिरवत पुन्हा केजच्या दिशेने घेतल्याचं ग्रामस्थ सांगतायत. संतोष देशमुख यांचा मृतदेहनंतर केजच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
हेही वाचा:
























