एक्स्प्लोर

मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास भर चौकात फाशी घेईन, संतोष बांगर यांचं चॅलेंज

Santosh Bangar on PM Modi : हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना (Shiv Sena) आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत (CM Eknath Shinde) गेले तेव्हापासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे वादात सापडत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Santosh Bangar on PM Modi : हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना (Shiv Sena) आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत (CM Eknath Shinde) गेले तेव्हापासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे वादात सापडत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण आता संजय बांगर वादात नाहीत, तर स्वतःच दिलेल्या चॅलेंजमुळे चर्चेत आले आहेत. 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर भरचौकात फाशी घेईल, असे चॅलेंज संतोष बांगर यांनी दिलं आहे. याआधीही त्यांनी मिशी काढण्याचं चॅलेंज दिलं होतं. त्यावेळी त्यांची चर्चा झाली होती. आता मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर फाशी घेईल, असे बांगर म्हणाले आहेत. 

संतोष बांगर यांचं चॅलेंज - 

कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर नेहमीच या ना त्याकारणाने चर्चेत असतात. आज त्यांनी एक नवीन चॅलेंज केलं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत. तसे झाले नाही तर स्वतः भर चौकात फाशी घेणार असल्याचे चॅलेंज आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे. संतोष बांगर यांच्या नव्या चॅलेंजची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याआधीही त्यांनी मिशी कापण्याचं चॅलेंज केले होते. 

मिशी कापण्याचं चॅलेंज - 

कळमनुरी बाजार समितीमध्ये सत्ता न आल्यास मिशी कापेल, असे चॅलेंज संतोष बांगर यांनी दिलं होतं. पण निवडणुकीनंतर येथे महाविकास आघाडीची सत्ता आली. महाविकास आघाडीने 12 जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीच्या प्रचाराची राज्यभर चर्चा झाली होती. आमदार बांगर यांनी या निवडणुकीवरुन चॅलेंज दिले होते. "या पॅनेलच्या 17 पैकी 17 जागा निवडून नाही आल्या तर मिशी ठेवणार नाही, असं आमदार संतोष बांगर म्हणाले होते. त्यावेळीही त्यांची जोरदार चर्चा झाली होती. 

अखेरीस एकनाथ शिंदेंना साथ - 

संतोष बांगर हे शिवसेनेचे हिंगोली जिल्हाप्रमुख आहेत. मागील आनेक वर्षांपासून ते जिल्हाप्रमुख आहेत. बांगर यांना 2019 मध्ये उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी दिली आणि कळमनुरी मतदार संघातून ते निवडून आले. सत्ता संघर्षात ते गुवाहटीला न जाता सर्वात शेवटी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेले.  

संतोष बांगर आणि वाद - 

संतोष बांगर आणि वाद काही नवा नाही. ते अनेकदा वादात अडकले आहेत. 26 जून 2022 शिवसेनेसोबत बेईमानी करणाऱ्यांच्या बायका त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत त्यांची मुले अविवाहित मरतील या विधानानंतर वाद झाला होता. 17 जुलै 2022 गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा या विधानानंतर मोठा वाद झाला.  

15 ऑगस्ट 2022 मध्यान भोजन योजनेतील जेवण पुरवठा करणाऱ्या गोडाऊन मधील व्यवस्थापकास मारहाण केली. 14 ऑक्टोबर 2022 पिक विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड  कृषी अधीक्षकाला शिवीगाळ आणि धमकावलं . ऑक्टोबर 2022 हॉस्पिटलच्या बिलावरून एका डॉक्टरला फोनवरून धमकी दिल्याचे ऑडियो क्लिप व्हायरल झाली. इतकेच काय तर ठाकरे गटात असताना आमदार संतोष बांगर यांनी नारायण राणे यांचा कोथळा बाहेर काढण्याची धमकी दिली होती. 4 नोव्हेंबर मंत्रालयातील पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget