एक्स्प्लोर

संजय शिरसाट यांच्यावर जो अन्याय झालाय, ते कधीही शिवसेनेत येऊ शकतात; ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा पुनरुच्चार

Sushma Andhare on Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्यावर जो अन्याय झालाय, ते कधीही शिवसेनेत येऊ शकतात, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा पुनरुच्चार

Sushma Andhare on Sanjay Shirsat : शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे पुन्हा ठाकरे गटात परतणार असल्याचा दावा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला होता. त्यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत माझी काळजी करण्याची गरज नाही, मी सक्षम आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर पुन्हा सुषमा अंधारे यांनी मत व्यक्त केलं असून त्यांना वेदना होत आहेत, मात्र त्या ते व्यक्त कशा करून  दाखवतील, असं उत्तर संजय शिरसाट यांना दिलं आहे. 

"आता त्यांची अडचण अशी आहे की, त्यांना बोलता येत नाहीये. गुवाहाटीला गेल्यावर शिंदे गटाची भूमिका मांडणारे पहिले आमदार जर कोण होते, तर ते संजय शिरसाट. पण, संभाजीनगरमध्ये आता अतुल सावे असतील, संदिपाल भूमरे किंवा अब्दुल सत्तार असतील यांना ज्या पद्धतीने अधिकार आणि फुलफ्लेज स्कोप दिला जात आहे, त्यामुळे संजय शिरसाट यांची कुचंबणा होत आहे. पण तरीही बोलताना संजय शिरसाट हसताना दिसून येत आहे. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो...", असं म्हणत अंधारे यांनी टोला लगावला आहे. 

"मी खरंच देवासाठी प्रार्थना करेल की, योग्य निर्णय घेण्यासाठी संजय शिरसाट यांना देव सद्बुध्दी देवो, असंही अंधारे म्हणाल्या आहेत. तसेच दीपक केसरकरांना खरंच गंभीरता कळत नाहीये, पण संजय शिरसाट यांच्यावर जो अन्याय झाला आहे, त्यामुळे ते कधीही शिवसेनेत येवू शकतात.", असा पुनरुच्चार सुषमा अंधारे यांनी केला आहे. 

"विष ओकणारे उद्धव ठाकरे गटात येत आहे. मग उद्या उद्धव ठाकरे हे ओवैसींची भेट घेतली का? असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक तुषार भोसले यांनी केलं आहे. या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. असली माणसं जी आहेत ना, ती भाजपनं फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी सुपारी बाज पद्धतीनं ठेवली आहेत. अशा माणसांना मी महत्व देत नाही आणि त्यांच्या टीकेला उत्तरही देत नाही, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं आहे. 

शरद कोळी यांना जिल्हा बंदी केल्यानंतर पोलिसांनी चोपडा येथील सभेला येत असताना तीन ठिकाणी माझी गाडी तपासली. गाडीमध्ये खरंच शरद कोळी बसले आहेत का? याची चौकशी केली, अशी माहितीही सुषमा अंधारे यांनी दिली आहे. पण आम्ही कायद्याचं पालन करतो. त्यानुसार शरद कोळी यांना जिल्ह्याबाहेर सोडेपर्यंत सोबत होतो, असंही त्यांनी सांगितलं.  

अण्णा हजारे यांचे लोकपाल विधेयकासाठीचं आंदोलन हे काँग्रेसचे सरकार घालवण्यासाठी भाजपचं षडयंत्र होतं, असा धक्कादायक आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. अण्णा हजारे यांची लोकपाल विधेयकाची मागणी ही संविधानाच्या चौकटी बाहेरची मागणी होती. आपल्याकडे जी संसदीय लोकशाही पद्धती आहे, ती मोडीत काढून, अध्यक्ष लोकशाही आणण्याचा तो एक प्रयत्न होता. कारण त्या मधल्या त्रुटी या कधीच दाखविण्याचा प्रयत्न झाला नाही. कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे विभक्त असले पाहिजे हे मूळ चौकट आहे. लोकपाल विधेयक जेव्हा या तिघांच्यावर बसवतात, तेव्हा तुम्ही संविधानिक चौकट मोडण्याचा प्रयत्न करतात, असं स्पष्टीकरणही सुषमा अंधारे यांनी यावेळी दिलं. तसेच लोकपाल आंदोलन ज्या पद्धतीनं अण्णा हजारे यांनी उभ केलं. सरकार उलथवून लावायचं आणि लोकांमध्ये एक लाट निर्माण करायची, यासाठीच होतं. लोकपाल आंदोलन हे सत्तेच्या विकेंद्रीकरणाऐवजी सत्तेच्या केंद्रीकरणावर आणि एक हाती सत्ता देण्यावर भर देणारे म्हणजेच, संविधानाच्या चौकटी बाहेरचं होतं, असं मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Maharashtra Politics: परतीचे दोर कापले नाहीत, शिंदे गटातील 'हा' आमदार आमच्या संपर्कात; सुषमा अंधारे यांचा मोठा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kim Kardashian : श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट, फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले
श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट, फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले
Kamathipura : कामाठीपुरातील 100 वर्षे जुन्या इमारतीवर हातोडा पाडण्यास हायकोर्टाची परवानगी, भाडेकरुंना दिलासा देण्यास नकार
कामाठीपुरातील 100 वर्षे जुन्या इमारतीवर हातोडा पाडण्यास हायकोर्टाची परवानगी, भाडेकरुंना दिलासा देण्यास नकार
वरळी अपघातातील  मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
वरळी अपघातातील मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
Video : माझा राजा रं... विशाळगडावर शाहू महाराजांनी अंगावरील जॅकेट काढलं, पावसात भिजणाऱ्या चिमुकलीला घातलं; लाखोंचं मन जिंकलं
Video : माझा राजा रं... विशाळगडावर शाहू महाराजांनी अंगावरील जॅकेट काढलं, पावसात भिजणाऱ्या चिमुकलीला घातलं; लाखोंचं मन जिंकलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10:00PM : 16 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPooja Khedkar on Suhas Divase : दिवसेंनी छळ केल्याचा पूजा खेडकरांचा आरोपZero Hour :  गडकिल्ल्यांवर अतिक्रमण ते शंकराचार्यांच्या वक्तव्यानंतरचं राजकारण;झीरो अवरमध्ये सविस्तर9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 PM : 16 July 2024 : ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kim Kardashian : श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट, फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले
श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट, फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले
Kamathipura : कामाठीपुरातील 100 वर्षे जुन्या इमारतीवर हातोडा पाडण्यास हायकोर्टाची परवानगी, भाडेकरुंना दिलासा देण्यास नकार
कामाठीपुरातील 100 वर्षे जुन्या इमारतीवर हातोडा पाडण्यास हायकोर्टाची परवानगी, भाडेकरुंना दिलासा देण्यास नकार
वरळी अपघातातील  मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
वरळी अपघातातील मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
Video : माझा राजा रं... विशाळगडावर शाहू महाराजांनी अंगावरील जॅकेट काढलं, पावसात भिजणाऱ्या चिमुकलीला घातलं; लाखोंचं मन जिंकलं
Video : माझा राजा रं... विशाळगडावर शाहू महाराजांनी अंगावरील जॅकेट काढलं, पावसात भिजणाऱ्या चिमुकलीला घातलं; लाखोंचं मन जिंकलं
पूजा खेडकर यांच्यासारखे लोकं राजकारणातही नसतात; आदित्य ठाकरेंची रोखठोक कमेंट
पूजा खेडकर यांच्यासारखे लोकं राजकारणातही नसतात; आदित्य ठाकरेंची रोखठोक कमेंट
तुम्ही गडावर कधी गेला आहात का, किल्यासाठी निधी दिलाय का?; हसन मुश्रिफांवर संभाजीराजेंचा पलटवार
तुम्ही गडावर कधी गेला आहात का, किल्यासाठी निधी दिलाय का?; हसन मुश्रिफांवर संभाजीराजेंचा पलटवार
आता, मसुरीत काय होणार, पूजा खेडकरांची निवड रद्द होणार का?; अविनाश धर्माधिकारींनी सांगितला अनुभव
आता, मसुरीत काय होणार, पूजा खेडकरांची निवड रद्द होणार का?; अविनाश धर्माधिकारींनी सांगितला अनुभव
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरांना Delhi AIMS मध्ये वैद्यकीय चाचणीसाठी कधी बोलावणार? कार्मिक मंत्रालय त्यांना पाठीशी घालतंय का?
पूजा खेडकरांना Delhi AIMS मध्ये वैद्यकीय चाचणीसाठी कधी बोलावणार? कार्मिक मंत्रालय त्यांना पाठीशी घालतंय का?
Embed widget