एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांनी शेतातील उपXXचं काम थांबवून जरांगेंशी चर्चा करावी, संजय राऊत यांचा हल्लाबोल

गिरीश महाजन आणि जालन्याचे खोतकर हे काही शिष्टमंडळ आहे का? हे टपोरी लोक आहेत.  हे खोके वाटप करायला ठीक आहे शिष्टमंडळ हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ असलं पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

मुंबई : मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange)  नेतृत्वाखालील मराठा मोर्चा (Maratha Morcha)  मुंबईच्या वेशीवर  येऊन धडकला आहे. मनोज जरांगेच्या आंदोलनाचा आजचा निर्णायक दिवस मानला जातोय.तोडगा काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत हाहाकार होईल.  राज्याचे मुख्यमंत्री शेतावर काहीतरी उपटत होते माहित नाही. परंतु  त्यांनी ही उपटा उपटी थांबवावी आणि राज्यात लक्ष घालावे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी दिली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. 

संजय राऊत म्हणाले, तोडगा काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत हाहाकार होईल.  मुख्यमंत्र्यांनी जरांगे जिथे आहेत तिथे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे.  हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राची सामाजिक कायदा सुव्यवस्थेची स्थिती यावर नियंत्रण ठेवण्याचा आहे.  राज्याचे मुख्यमंत्री शेतावर काहीतरी उपटत होते, काय उपटत होते माहीत नाही.  त्यांनी ही उपटा उपटी थांबवावी आणि राज्यात लक्ष घालावे. गिरीश महाजन आणि जालन्याचे खोतकर हे काही शिष्टमंडळ आहे का? हे टपोरी लोक आहेत.  हे खोके वाटप करायला ठीक आहे शिष्टमंडळ हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ असलं पाहिजे.

भारतीय घटनेच्या आणि संविधानाच्या चिंधड्या उडविल्या जात आहे : संजय राऊत

 गेल्या दहा वर्षात या देशात संविधान राहिलेलं नाही. भारतीय घटनेच्या आणि संविधानाच्या चिंधड्या उडविल्या जात आहे. सत्ताधाऱ्यांचा गुलाम म्हणून न्यायलय आणी निवडणूक आयोग काम करत आहेत. आमचा विरोध हा हुकूमशाहीला आहे संविधान नहीं हम करे सो कायदा संविधानिक पदावर नेमलेले व्यक्ती हे सरपटणाऱ्या प्राण्यांसारखे काम करीत आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. 

हिंदू मुस्लमानांच्या दंगली करून  400 पारचा  नारा : संजय राऊत

 भाजपाची 2024 च्या निवडणुकांना सामोरे जाताना दंगली घडविण्याची  कटकारस्थान आहे.  हिंदू मुस्लमानांच्या दंगली करून यांचा 400 पार नारा दंगलीच्या आगीतून आला आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

महविकास आघाडीत कुठलाही मतभेद नाही: संजय राऊत

महविकास आघाडीच्या जागावाटपावर बोलताना संजय राऊत म्हणाले, जवळजवळ दृष्टीपथावर तोडगा आलेला आहे.  आठ ते नऊ तास आम्ही काल चर्चा केली.  आमच्यात कुठलीही मतभेद नाहीत. 30  तारखेला वंचीत देखील आमच्या चर्चेत सहभागी होईल.  चेहरा पक्ष आणि खाली असलेल्या कार्यकर्त्यांचं केडर या तीन सूत्रांचा वापर आम्ही जागा वाटपा संदर्भात करत आहोत. मुंबईबाबत नंतर चर्चा करणार आहे. 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCP : राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडून मित्रपक्षांच्या मदतीबाबत प्रश्न अन् भाजपच्या भूमिकेवर नाराजी, अजित पवारांसमोर अडचणी मांडल्या
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांचे भाजपच्या भूमिकेवर प्रश्न, अजित पवारांसोबतच्या बैठकीत काय घडलं?
गृह खात्याऐवजी भाजपकडून एकनाथ शिंदेंना 3 पर्याय; शिवसेना तोडीस-तोड खात्यासाठी आग्रही
गृह खात्याऐवजी भाजपकडून एकनाथ शिंदेंना 3 पर्याय; शिवसेना तोडीस-तोड खात्यासाठी आग्रही
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्ली मार्च; बॅरिकेड्स तोडले, तारांचं कुंपणही उखडून फेकले, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, 7 शेतकरी जखमी
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्ली मार्च; बॅरिकेड्स तोडले, तारांचं कुंपणही उखडून फेकले, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, 7 शेतकरी जखमी
Nitish Kumar Reddy : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
Video : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik UnSeasonal Rain | नाशिकमध्ये अवकाळीचा फटका, फळबागांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिलNana Patole PC | राज्यात महायुतीचे सरकार, नाना पटोलेंनी दिल्या फडणवीसांना शुभेच्छाSpecial Report | CM Fadanvis Challenges : पुन्हा आल्यानंतर देवेंद्र फडवीस सरकारसमोर कोणती आव्हानं?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 06 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP : राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडून मित्रपक्षांच्या मदतीबाबत प्रश्न अन् भाजपच्या भूमिकेवर नाराजी, अजित पवारांसमोर अडचणी मांडल्या
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांचे भाजपच्या भूमिकेवर प्रश्न, अजित पवारांसोबतच्या बैठकीत काय घडलं?
गृह खात्याऐवजी भाजपकडून एकनाथ शिंदेंना 3 पर्याय; शिवसेना तोडीस-तोड खात्यासाठी आग्रही
गृह खात्याऐवजी भाजपकडून एकनाथ शिंदेंना 3 पर्याय; शिवसेना तोडीस-तोड खात्यासाठी आग्रही
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्ली मार्च; बॅरिकेड्स तोडले, तारांचं कुंपणही उखडून फेकले, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, 7 शेतकरी जखमी
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्ली मार्च; बॅरिकेड्स तोडले, तारांचं कुंपणही उखडून फेकले, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, 7 शेतकरी जखमी
Nitish Kumar Reddy : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
Video : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीवाले आग्रही, तर चंद्रकांत पाटील म्हणाले...
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीवाले आग्रही, तर चंद्रकांत पाटील म्हणाले...
अफलातून... डॉ. बाबासाहेबांची महाप्रतिमा, 3 क्विंटल तांदूळ, 30 जणांची टीम अन् 24 तास, ड्रोन शूट व्हायरल
अफलातून... डॉ. बाबासाहेबांची महाप्रतिमा, 3 क्विंटल तांदूळ, 30 जणांची टीम अन् 24 तास, ड्रोन शूट व्हायरल
संजय राऊतांना आवरा, त्यांच्यापासून अंतर ठेवा, नाहीतर उरले सुरले आमदारही... शंभूराज देसाईंचं सूचक वक्तव्य 
संजय राऊतांना आवरा, त्यांच्यापासून अंतर ठेवा, नाहीतर उरले सुरले आमदारही... शंभूराज देसाईंचं सूचक वक्तव्य 
Maharashtra Weather Update: दरवर्षीपेक्षा राज्यात यंदा कमी प्रमाणात थंडी; शेतकर्‍यांनाही सतर्कतेचा इशारा, काय म्हणाले हवामान शास्त्रज्ञ?
दरवर्षीपेक्षा राज्यात यंदा कमी प्रमाणात थंडी; शेतकर्‍यांनाही सतर्कतेचा इशारा, काय म्हणाले हवामान शास्त्रज्ञ?
Embed widget