Sanjay Raut: आमचं राजकारण नकलांवर उभं नाही, आम्ही बोलत राहू; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला
MNS Foundation Day: काही माणसं आजारी नसतानाही सक्रिय नसतात असा टोला खासदार संजय राऊतांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंना लगावला आहे.
मुंबई: आमचं राजकारण हे नकलावर उभं नाही, आम्ही बोलत राहू असा टोला खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावला आहे. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, परखड मत व्यक्त करत राहू असंही ते म्हणाले. मनसेच्या 16 व्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला होता. त्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं.
खासदार संजय राऊत म्हणाले की, आमचं राजकारण हे नकलांवर आधारित नाही. आम्हाला ईडीने बोलावलं म्हणून आम्ही बोलत राहिलो, आणि यापुढेही बोलतच राहू. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, जे खरं असेल ते परखडपणे बोलणार. कर नाही त्याला डर कशाला?
काहीजण आजारी नसतानाही सक्रिय नसतात...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी असतानाही सक्रिय आहेत असं सांगताना संजय राऊत म्हणाले की, काही माणसं आजारी नसतानाही सक्रिय नसतात. राज ठाकरेंनी मनसेच्या 16 व्या वर्धापनदिनानिमित्त भाषण करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय राऊत भाजपवर टीका करण्यासाठी पत्रकार परिषदा घेत आहेत. त्यावर आज राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले की, "चॅनेल लागलं तर हे सुरू, चॅनेल हटलं तर हे बंद. मग नंतर यांचं पुन्हा कसं काय सुरू, काय चाललंय. भविष्यातील महाराष्ट्रातील पिढ्या या पाहतायत, ते काय शिकतील? यांना फक्त निवडणुकीचं पडलं आहे."
महत्त्वाच्या बातम्या:
- चॅनेल लागले तर हे सुरू..., इतर वेळी मग काय सुरू, काय चाललंय?; राज ठाकरेंनी उडवली संजय राऊतांची खिल्ली
- 'माझ्या राजाची जयंती तारखेप्रमाणे, तिथीप्रमाणेच काय 365 दिवस साजरी करा' - राज ठाकरे
- Raj Thackeray: राज्यपालांना काही समज आहे का? महापुरुषांबद्दल काहीही बोलून भांडणं लावायचे यांचे उद्योग; राज ठाकरेंची राज्यपालांवर सडकून टीका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha