'माझ्या राजाची जयंती तारखेप्रमाणे, तिथीप्रमाणेच काय 365 दिवस साजरी करा' - राज ठाकरे
Raj Thackeray live : मनसेच्या 16 व्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे पुण्यात उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
Raj Thackeray live : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेप्रमाणे जयंती 19 फेब्रुवारी रोजी पार पडली असून यंदा तिथीप्रमाणे जयंती 21 मार्च रोजी असणार आहे. याबाबत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'माझ्या राजाची जयंती आणि तारखेप्रमाणेच काय तर वर्षाचे 365 दिवस साजरी करा' असं विधान केलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 16 वा वर्धापनदिन आज पार पडला. यंदा पहिल्यांदाच मुंबईबाहेर हा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्यासाठी पुण्यात सर्व मनसे पदाधिकारी आणि स्वत: राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. राज्यपालांच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्याबाबतच्या वक्तव्यापासून ते संजय राऊतांबद्दल राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. याचवेळी मागी अनेक वर्ष सुरु असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या नेमक्या तारखेबाबतही राज यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी ज्या शिवाजी महाराजांमुळे मराठी भाषा आणि मराठी माणसांची ओळख आहे, त्यांची जयंती तारखेप्रमाणे किंवा तिथीप्रमाणेच काय तर वर्षाचे 365 दिवस साजरे करा. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे सण असंही राज ठाकरे यांवी म्हणाले.
संजय राऊतांवर टीका
गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय राऊत भाजपवर टीका करण्यासाठी पत्रकार परिषदा घेत आहेत. त्यावर आज राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले की, "चॅनेल लागलं तर हे सुरू, चॅनेल हटलं तर हे बंद. मग नंतर यांचं पुन्हा कसं काय सुरू, काय चाललंय. भविष्यातील महाराष्ट्रातील पिढ्या या पाहतायत, ते काय शिकतील? यांना फक्त निवडणुकीचं पडलं आहे."
राज ठाकरे पुढे म्हणाले की, "सत्ताधारी म्हणतात आम्हाला संपवायला निघाले आहेत, विरोधी पक्ष म्हणतात आम्हाला संपवायला निघालेत. टीव्हीवर शिव्या सुरू आहेत, हेच राजकारण वरती असेल तर ग्रामपंचायतीमध्ये काय सुरू असेल. महाराष्ट्रातील लोक यांना वैतागले आहेत. त्यामुळे त्यांना काही अडचणी आल्या तर ते सरकारकडे न जाता आपल्याकडे येतात हे आपलं यश आहे. या 16 वर्षात लोक आपल्याकडे विश्वासाने येतात, ही 16 वर्षे आपली कमाई आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी जे काम केलं त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत."
हे ही वाचा -
- Raj Thackeray: राज्यपालांना काही समज आहे का? महापुरुषांबद्दल काहीही बोलून भांडणं लावायचे यांचे उद्योग; राज ठाकरेंची राज्यपालांवर सडकून टीका
- चॅनेल लागले तर हे सुरू..., इतर वेळी मग काय सुरू, काय चाललंय?; राज ठाकरेंनी उडवली संजय राऊतांची खिल्ली
- Raj Thackeray: …जेव्हा राज ठाकरेंना रात्री पावणे तीन वाजता अटक झाली, जाणून घ्या काय आहे किस्सा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha