एक्स्प्लोर

 न्यायदेवताही एक स्त्री आहे, कोर्टाने लोक भावनेचा आदर करायला हवा होता; महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut : कोर्टालासुद्धा लेकी-बाळी, सासू, सुना आहेत. कोर्टसुद्धा एक माणूसच असून न्यायदेवता एक स्त्री आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली आहे.

Sanjay Raut on Maharashtra Bandh : राज्यात सध्या सुरू असलेला निषेध हा लोकभावनेचा उद्रेक आहे, हा साधा विषय नाही. खऱ्या अर्थाने न्यायालयाने जनभावनेचा आदर करायला हवा होता. ज्या प्रकारच्या घटना महाराष्ट्रात घडत आहे ते बघता इथे कोणीही सुरक्षित नाही. कोर्टालासुद्धा लेकी-बाळी सासू, सुना आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. कोर्टसुद्धा एक माणूसच असून न्यायदेवता एक स्त्री आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. सध्या घडीला न्यायदेवतेवर देखील अत्याचार होत आहेत. त्यासाठीच आमची लढाई होती. मात्र कोर्टाने अशा प्रकारच्या निर्णय का दिला हे काळाले नाही. शिवसेनानेच्या (Shivsena) निकालाबद्दल ज्याप्रमाणे तारखांवर तारखा वाढत आहेत, हाही एक प्रकारे राज्यघटनेवरचा बलात्कारच आहे.

 मात्र या बंद बाबतच्या निर्णयाला आम्ही असे म्हणणार नाही की, हा निर्णय कोणाच्या दबावाखाली दिला. पण आम्हाला राज्यातील महिला, युवती आणि कायद्याची काळजी आहे. म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाहीमध्ये आंदोलनाला फार महत्त्व आहे. मात्र आमचा आवाज दाबत असेल तर लोकशाहीला फार महत्त्व उरणार नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी बोलताना दिलीय.

कोर्टालाही लेकी-बाळी,सुना आहेत हे लक्षात घ्या - संजय राऊत    

बदलापूरची घटना हे अमानवी कृत्य असून त्याच्या निषेधार्थ आज बंद पुकारला होता. आजचा बंद हा स्वयंपूर्तीने पुकारण्यात आलेला बंद होता. जनतेचा आक्रोश देशभरात पोहोचवण्यासाठीचा आजचा बंद होता. तो कुठलाही राजकीय बंद नव्हता. किंबहुना आजचा बंद हा शंभर टक्के यशस्वी होणार होता. ज्यामुळे सरकारला अडचण झाली असती. नुकतीच  देशभरात भारत बंदची हाक देण्यात आली होती. राज्यसह देशभरात त्याचे पडसाद उमटले. तेव्हा मात्र कोणीही कोर्टात गेले नाही. मात्र महाराष्ट्र बंदची हाक देताच  सरकारने एका लाडक्या याचिकाकर्त्याला कोर्टात पाठवलं आणि त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला. मात्र दुर्दैवाने  यापुढे जर अशी घटना घडली तर त्यासाठी न्यायालय आणि त्या संबंधित याचिकाकर्ते जबाबदार राहतील असेही संजय राऊत म्हणाले. 

न्यायालयाचा आदर हा राखावाच लागतो- संजय राऊत  

माननीय न्यायालयाचा आदर हा राखावाच लागतो. त्यामुळे आज आम्ही बंद जरी मागे घेतला असला तरी महाविकास आघाडी राज्यभरात तोंडाला काळा पट्ट्या बांधून रस्त्यावर उतरणार आहोत. काही वेळातच उद्धव ठाकरे आणि असंख्य शिवसैनिक शिवसेना भावना पुढे आयोजित अशा प्रकारच्या आंदोलनात सहभागी होतील. सोबतच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते नाना पटोले इत्यादी सह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते ठीकठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहितीही संजय राऊत यांनी दिली.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Embed widget