(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : संजय राऊतांच्या जामिनावरील स्थगितीच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामिनावरील स्थगितीच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Sanjay Raut : तब्बल 100 दिवसानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची बुधुवारी (9 नोव्हेंबर) तुरुंगातून सुटका झाली. मात्र, या जामिनाला ईडीचा (ED) विरोध कायम आहे. या विरोधात ईडीने उच्च न्यायालयात अपिल केलं आहे. त्यावर न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत पीएमएलए कोर्टानं ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहे. दिवाणी खटल्यासाठी पीएमएलए कायदा लागू केला असल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले आहेत.
शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांना काल कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. 100 दिवसानंतर संजय राऊत तुरुंगाबाहेर आले. संजय राऊत यांना जामीन मिळताच शिवसैनिकांनी जल्लोष केला.न्यायालयाच्या परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांची आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक त्या ठिकाणी आले होते. शिवसैनिकांच्या गराड्यातच त्यांनी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. संजय राऊतांनी नंतर बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.
ईडीचा युक्तीवाद काय?
तब्बल 100 दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, ईडीनं (ED) कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायला हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे. त्यामुळं आता ईडीच्या युक्तीवादावर कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बुधुवारी कोर्टात नेमकं काय घडलं
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयानं दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती देशपांडे यांच्यासमोर पार पडली. मात्र, कोर्टाच्या निर्णयावर ईडीच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला आहे. तसेच, या जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. हे छोटंमोठं प्रकरण नाही, मोठी नावं यात सहभागी आहेत. त्यामुळे या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायलाच हवी अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली आहे. या आठवड्याचे केवळ दोन कामकाजाचे दिवस बाकी आहे. त्यामुळं किमान या आठवड्याभराची स्थगिती द्यावी. जेणेकरून आम्ही या निकालाचा अभ्यासकरून येत्या आठवड्यात हायकोर्टात दाद मागू शकू, असा युक्तिवाद ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे. दरम्यान, जामीनाबाबत आज दुपारी तीन वाजता न्यायालय निकाल देणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: