एक्स्प्लोर

हॅलो बाळासाहेब.... तुम्ही खात्री बाळगा, आमचा कणा अजून मोडलेला नाही, तुम्हाला अपेक्षित शिवसेना पुन्हा उभी करू; संजय राऊतांचा बाळासाहेबांना शब्द

Sanjay Raut Call to Balasaheb Thackeray : झी मराठीवरील 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांना त्यांच्या आयुष्यातील एका व्यक्तीला फोन लावण्याची संधी मिळते. त्यावेळ संजय राऊतांनी थेट

Sanjay Raut Call to Balasaheb Thackeray : शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर राज्यातील संपूर्ण राजकारणालाच कलाटणी मिळाली. राज्यासह संपूर्ण देशानंच अभूतपूर्व सत्तासंघर्ष अनुभवला. शिवसेनेती प्रबळ नेते म्हणून ओळख असणाऱ्या एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि त्यांच्यासह काही आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर शिंदे गटात इनकमिंग आणि ठाकरे गटात आऊटगोईंग सुरूच होतं. त्यानंतर राज्यात सत्तेत असणारं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. शिवसेनेत अंतर्गत फूट पडली. ठाकरे गटाकडून शिंदे गटाचा उल्लेख वारंवार गद्दार असा करण्यात येतो. आता या सर्व घडामोडींची तक्रार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे केली आहे.  

झी मराठीवरील 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांना त्यांच्या आयुष्यातील एका व्यक्तीला फोन लावण्याची संधी मिळते. अर्थात हा फोन पूर्णपणे काल्पनिक असतो. सध्या हयात असलेल्या किंवा हयात नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही फोन लावू शकता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गायक अवधूत गुप्ते करतात. या शोचा आगामी एपिसोड ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासोबत शूट करण्यात आला. कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी राऊतांना कोणाला फोन लावाल? असा प्रश्न विचारला. तेव्हा संजय राऊत यांनी मागचा पुढचा विचार न करता थेट बाळासाहेब ठाकरेंना फोन लावला. बाळासाहेबांना फोन करुन राऊतांनी त्यांच्याकडे शिवसेनेतील अंतर्गत फुट आणि त्यानंतर उद्भवलेल्या सत्तासंघर्षाबाबत तक्रारी केल्या आहेत. तसेच, संजय राऊतांना बाळासाहेबांना आश्वासनंही दिली आहेत. 

शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी नाही झाला.... 

हॅलो बाळासाहेब.... नमस्कार! 

तुम्ही आम्हा लोकांना सांगितलं की, शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. ज्या धनुष्यबाणाची आपण पूजा करत होतो. तोच धनुष्यबाण स्वत:ला महाशक्ती म्हणवणाऱ्यांनी चोरलाय. पण तुम्ही खात्री बाळगा. आमचा कणा अजूनही मोडलेला नाही, तुम्हाला अपेक्षित असेलेली शिवसेना तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल, असं आश्वासन संजय राऊत यांनी या फोनवर बोलताना बाळासाहेबांना दिलं.

तुम्ही शिवसैनिकांना एक वाक्य नेहमीच सांगायचात की, आपण सत्तेसाठी जन्म नाही घेतलाय, तर सत्तेनं आपल्यासाठी जन्म घेतलाय. हे लक्षात ठेवून आम्ही पुढे जाणार आहोत, असा शब्दही संजय राऊतांनी बाळासाहेबांना दिला. 

दरम्यान, यापूर्वी संजय राऊतांपूर्वी 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही हजेरी लावली होती. कार्यक्रमात बोलताना नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं, नारायण याला खासदार करायचंय आपल्याला. मी फक्त त्यांचा शब्द पूर्ण केलाय, असं ते म्हणाले होते. यालाही संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राणे खोटं बोलतायत. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांची खासदारकी जाऊ शकते, असंही संजय राऊत म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandgad Vidhan Sabha : तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
Shrinivas Pawar : बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baramati : Shrinivas Pawar यांच्या शरयू मोटर शोरुमध्ये सर्च ऑपरेशन,तपासणीत काही न आढळल्याची माहितीCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 19 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaVidhansabha Election 2024 :  मालिकांमधून छुप्या पद्धतीने प्रचाराचा शिंदे गटावर आरोपPune Flex :  ब्रीद वाक्यांचा वापर करत पुण्यात फ्लेक्सची उभारणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandgad Vidhan Sabha : तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
Shrinivas Pawar : बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
Raj Thackeray Vs Uddhav Thackeray: तुमच्या घरात सुनेला जाच होतो वाटतं; उद्धव ठाकरेंना खाष्ट सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना किशोरी पेडणेकरांनी सुनावलं
अमितच्या बायकोशी शर्मिला ठाकरे खाष्ट सासूप्रमाणे वागतात का? किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर बोचरा वार
Vinod Tawde: विनोद तावडे 5 कोटी घेऊन आले, दोन डायऱ्याही सापडल्याचा आरोप; विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा
विनोद तावडे 5 कोटी घेऊन आले, दोन डायऱ्याही सापडल्याचा आरोप; विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Embed widget