'तुझे काटू क्या'? म्हटल्यावर कोंबडी मान हलवून म्हणते 'नको नको नको...!' सांगलीत व्हिडीओ व्हायरल
दुकानदार जेव्हा 'कापू का' म्हणतो त्यावेळी सांगलीतली एक कोंबडी जीवाच्या भीतीनं 'नाही नाही नाही' अशी मान हालवत आहे. आश्चर्य वाटतंय ना... मात्र हे खरंय.
सांगली : एकीकडे बर्ड फ्लूमुळं कोंबड्यांवर संक्रात आली असताना शासनाकडून चिकन खाण्याने काही परिणाम होत नसल्याबाबत जनजागृती सुरुय. राज्यातील काही भागात बर्ड फ्ल्यूमुळं हजारो कोंबड्या मारल्या गेल्या आहेत. मात्र सांगलीतली एक कोंबडी जीवाच्या भीतीनं दुकानदार जेव्हा 'कापू का' म्हणतो त्यावेळी 'नाही नाही नाही' अशी मान हालवत आहे. आश्चर्य वाटतंय ना... मात्र हे खरंय.
हातात सूरी घेऊन 'तुझे काटू क्या'? असे म्हणत असलेला एक चिकन दुकानदार आणि मुंडी मुरगळुन बसलेली आणि मुंडी हलवत नको, नको, नको अशी म्हणतेय अशी एक कोंबडी. असा सगळा पोट धरून हसवणारा कार्यक्रम असेलला एक व्हिडीओ आज सांगलीत सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. चिकनच्या दुकानामधील मुलगा हातात सूरी घेऊन जोरजोराने ओरडतोय, तुझे काटू क्या'?..काटू. आणि खाली असलेली कोंबडी देखील त्या तरुणाला तितकाच प्रतिसाद देत मुंडी हलवत हलवत ही नको नको म्हणतेय असे वाटेल असं चित्र व्हिडीओत आहे.
कोंबड्याचा बड्डे! बेळगावात साजरा केला कोंबड्याचा पाचवा वाढदिवस
सांगलीतील अनेकांच्या व्हॉट्सअॅप वर हा व्हिडीओ व्हायरल होतोय. पण अद्याप नेमका हा कोणत्या भागातील दुकांनातील व्हिडीओ आहे हे कळू शकले नाही. मात्र या व्हिडीओने लोकांना पोट धरून धरून डोळ्यात पाणी येईपर्यंत हसवलं आहे हे मात्र नक्की.
अण्णा.. अण्णा म्हणणारा कोंबडा लवकरच सिनेमात झळकणार!
एकीकडे बर्ड फ्लू मुळे पोल्ट्री व्यवसायवर संकट आहे. लाखोंच्या घरात कोंबड्याची कत्तल या रोगामुळे केली गेली. या सगळ्या परिस्थितीत एका कोंबडीचा अशा पध्दतीने व्हायरल झालेला व्हिडिओ चांगलाच चर्चेत ठरला आहे.
याआधी सांगलीतला अण्णा म्हणणारा कोंबडा आला होता चर्चेत सांगलीच्या आळसंद गावातील अण्णा म्हणून ओरडणारा एक कोंबडा चर्चेत आला होता. विशेष म्हणजे कोंबड्याला एका चित्रपटाची ऑफर आली होती. कर्नाटकमधील एका दिग्दर्शकाने ही ऑफर दिली होती. याशिवाय बीडमधील काही लोक या कोंबड्यावर शॉर्ट फिल्म करणार होते. एबीपी माझावर ही बातमी आल्यानंतर या कोंबड्याच्या बातमीवरुन सोशल मीडियावर जोक्स देखील आले होते. तालुका, जिल्हा आणि राज्यभरातून अनेक लोकांनी गावात जाऊन हा कोंबडा पहिला. अनेक हौशी लोकांनी लाखो रुपये देऊन हा कोंबडा विकत घेण्याचे आमिष दाखवले. पण अण्णांनी यास नकार दिला.