एक्स्प्लोर
कृष्णा नदीत पोहणाऱ्या मुलांच्या घोळक्यात 18 फुटी मगर घुसली!
जवळपास 70 जण नदीत पोहत होते. पोहताना मगर दिसताच काहींना आरडाओरड सुरु केला, त्यामुळे धावाधाव झाली.
सांगली : कृष्णा नदीत आज सकाळच्या सुमारास पोहणाऱ्यांच्या घोळक्यात अचानक 18 फुटी मगर घुसली. यामुळे पोहणाऱ्या मुलांसह नदीच्या काठावरील सगळ्यांचाच थरकाप उडाला.
आज सकाळी नऊच्या सुमारास ही थरारक घटना कृष्णा नदीच्या पात्रात घडली. जवळपास 70 जण नदीत पोहत होते. पोहताना मगर दिसताच काहींना आरडाओरड सुरु केला, त्यामुळे धावाधाव झाली. मात्र मगरीला वेळीच हुसकावल्याने 70 जणं बचावली.
सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण आणि मोहन पेंडसे यांनी बोटीच्या मदतीने मगरीला हुसकावून लावलं. जवळपस अर्धातास हा थरार सुरु होता.
सध्या ऊन्हाळ्याचे दिवस असल्याने पोहायला प्रचंड गर्दी असते. विशेष शाळकरी मुले पोहण्यास शिकायला येत असल्याने नदी काठावर गर्दी वाढलेली दिसते. त्यामुळे पोहणाऱ्यांनी मगरीपासून सावध राहावं, असं आवाहन करण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement