एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

आदित्य ठाकरेंची बदनामी करणाऱ्या समीत ठक्करला जामीन मंजूर मात्र पुन्हा मुंबई पोलिसांच्या ताब्यात

अवघ्या 32 वर्षांच्या समीत ठक्करला ट्विटर वर तब्बल 60 हजार लोकं फॉलो करतात. यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेलमंत्री पियुष गोयल आणि भाजपचे अनेक मातब्बर नेत्यांचा समावेश आहे.

नागपूर : ट्वीटरवर मंत्री आदित्य ठाकरे यांना पेंग्विन तर ठाकरे सरकारला औरंगजेब आणि पॉवरलेस सरकार म्हणणाऱ्या समीत ठक्करला नागपूरच्या सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर होताच मुंबई पोलिसांनी मुंबईच्या प्रकरणात समीतला ताब्यात घेतले. दुरांतो एक्प्रेसने मुंबई पोलीस समीत ठक्करला घेऊन निघणार आहे. उद्या सकाळी ते मुंबईला पोहोचणार आहे.

अवघ्या 32 वर्षांच्या समीत ठक्करला ट्विटर वर तब्बल 60 हजार लोकं फॉलो करतात. यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेलमंत्री पियुष गोयल आणि भाजपचे अनेक मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. नागपूर पोलिसांनी 24 ऑक्टोबरला समीत ठक्करला राजकोट मधून ताब्यात घेत नागपूरला आणले होते.

कोण आहे समीत ठक्कर?

32 वर्षांचा नागपूरचा तरुण समीत ठक्कर ट्विटर वर प्रचंड सक्रिय आहे. नागपूरच्या व्हिएमवी कॉलेजमधून त्याने बीकॉमचे शिक्षण पूर्ण केले असून त्याच्या कुटुंबाचा नागपुरात ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. समीतचे ट्विटर वर 60 हजार फॉलोवर्स आहेत. समीत जरी भाजप नेते फोलो करत असले तरी समीत आमचा कार्यकर्ता नाही, तो पक्षाच्या कुठल्याही व्यासपीठावर पक्षाशी थेट संबंधित नाही, असे भाजपने स्पष्ट केले आहे. तर समीत भाजपच्या आयटी सेलचा कार्यकर्ता असल्याचे आरोप शिवसेनेने केले आहे. समीतचे एक काका कधी काळी शिवसेनेचे स्थानीय नेते राहिले आहे. मात्र, आता ते पक्षात नाहीत.

मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यावर टीका

गेले अनेक आठवडे समीत ठक्कर महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीका करत होता. कोरोनाचा वाढत संक्रमण असो, वैद्यकीय सेवांमधील गौडबंगाल असो, पूर्व विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी निर्माण झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान या सर्व मुद्द्यांना घेऊन त्याने अनेक ट्विट्सच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर टीका केली होती. एवढेच नाही तर ठाकरे सरकारचा उल्लेख सतत मॉर्डन औरंगजेब, पॉवरलेस सरकार असा ही केला होता. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना छोटा पेंग्विन संबोधत ट्विटरवर अनेकवेळा त्यांची खिल्लीही उडविली होती. त्यामुळे शिवसैनिकांनी समीत ठक्कर विरोधात 12 ऑगस्टला नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली होती. त्यावर कारवाई करताना पोलिसांनी 24 ऑक्टोबरला त्याला गुजरातमधील राजकोट मधून ताब्यात घेत नागपूरला आणले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Ahmednagar News : 'धार्मिक स्थळाजवळ मद्य अन् मांस विक्रीच्या दुकानांना निर्बंध घालावेत', अहमदनगरच्या वारकऱ्यांची मागणी, विखे पाटील म्हणाले...
'धार्मिक स्थळाजवळ मद्य अन् मांस विक्रीच्या दुकानांना निर्बंध घालावेत', अहमदनगरच्या वारकऱ्यांची मागणी, विखे पाटील म्हणाले...
Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik : मनसेच्या 500 पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे देणार कानमंत्रएबीपी माझा हेडलाईन्स : Abp Majha Headlines : 07 AM 06 October 2024ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 AM 06 October 2024Sambhajiraje Pune : अरबी समुद्रात जाऊन शिवस्मारकाच्या कामाची पाहणी करणार, संभाजीराजे आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Ahmednagar News : 'धार्मिक स्थळाजवळ मद्य अन् मांस विक्रीच्या दुकानांना निर्बंध घालावेत', अहमदनगरच्या वारकऱ्यांची मागणी, विखे पाटील म्हणाले...
'धार्मिक स्थळाजवळ मद्य अन् मांस विक्रीच्या दुकानांना निर्बंध घालावेत', अहमदनगरच्या वारकऱ्यांची मागणी, विखे पाटील म्हणाले...
Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
IND W vs PAK W : भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये हायव्होल्टेज लढत, हरमनप्रीत कौरपुढं करो वा मरो स्थिती
भारतापुढं करो या मरो स्थिती, पाकिस्तानवर विजय मिळवावा लागणार, हरमनप्रीत कौरच्या टीमपुढं मोठं आव्हान  
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
Akola Crime: अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Embed widget