एक्स्प्लोर

Sambhajiraje Chhatrapati Agitation Live : मागण्या मान्य झाल्यानं संभाजीराजे छत्रपतींनी उपोषण सोडलं

MP Sambhajiraje Chhatrapati Agitation Live Update : खासदार संभाजीराजे हे शनिवारपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी ते उपोषणाला बसले आहेत.

LIVE

Key Events
Sambhajiraje Chhatrapati Agitation Live  : मागण्या मान्य झाल्यानं संभाजीराजे छत्रपतींनी उपोषण सोडलं

Background

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhijiraje Chhtrapati) हे आमरण उपोषणाला बसले आहेत. कालपासून आझाद मैदानावर त्यांच्या उपोषणाल सुरूवात झाली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी अनेक ठिकाणाहून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदानातच पहिल्या रात्रीचा मुक्काम केला. दरम्यान, मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्धार संभाजीराजेंनी केला आहे.

15 फेब्रुवारीला संभाजीरजे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी आमरण उपोषण करणार असल्याची माहिती दिली होती. एकटे संभाजीराजे जरी उपोषणाला बसणार असले तरी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. कालच्या दिवसभरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. तसेच राज्यातील विविध संघटनांनी देखील संभाजीराजेंना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या या उपोषणाला अनेक संघटनांसह नेत्यांचा देखील पाठिंबा मिळत आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भर पडली आहे. त्यांनी संभाजीराजे यांना पाठिंब्याचे पत्र देत या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, काल दिवसभरात अनेक नेत्यांनी उपोषणस्थळी हजेरी लावली, तसेच संभाजीराजे यांची भट घेतली. भाजपचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आझाद मैदानावर येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील हे देखील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज तुळजापूर येथे लक्षणिक उपोषण करणार आहेत. तसेच काल हातकणंगले मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी देखील उपोषणस्थळी हजेरी लावत संभाजीराजे यांना पाठिंबा दर्शवला. छत्रपती घराण्याच्या तलवारीची ख्याती आहे. आज या राजघराण्याला मराठा समाजाच्या मागण्यासाठी उपोषण करावं लागतंय. संभाजीराजेंना उपोषण करावं लागलं हा माझा आयुष्यातील काळा दिवस आहे असं शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी म्हटलंय. माझे राजे उपाशी असताना मी घरात कसा बसेन? मी इथं छत्रपतींचा मावळा म्हणून आलोय. दिल्लीमध्ये आम्ही राजेंच्या सोबत लढतोय. आज मराठा समाजाच्या मागण्यांसाठी राजघराण्याला उपोषणासाठी बसावं लागतंय हा माझ्या आयुष्यातील काळा दिवस असल्याचे ते म्हणालेत. महाविकास आघाडीच्या या संदर्भात बैठका सुरू आहेत. मी यासंबंधी मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाने मांडणार असून यावर लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असेही माने म्हणाले. 

17:50 PM (IST)  •  28 Feb 2022

Sambhajiraje Chhatrapati Agitation : मागण्या मान्य झाल्यानं संभाजीराजे छत्रपतींनी उपोषण सोडलं

 Sambhajiraje Chhatrapati Agitation : मागण्या मान्य झाल्यानं संभाजीराजे छत्रपतींनी उपोषण सोडलं आहे.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांचे संभाजीराजेंनी आभार मानले.

15:09 PM (IST)  •  28 Feb 2022

Maratha Reservation : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा ताफा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवला

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा ताफा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवला, शेगाव येथील शिवाजी चौकात एका 12 वर्षीय मराठा मुलाने ताफा अडविला 

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सुरू असलेल्या खा.संभाजीराजे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अडवला ताफा.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं , यासाठी ताफा अडवून ना.नितीन राऊत यांना दिलं निवेदन.

दोन दिवसांच्या बुलढाणा  दौऱ्यावर आहेत ऊर्जा मंत्री ,यावेळी पोलिसांची चांगलीच दमछाक बघायला मिळाली.

15:04 PM (IST)  •  28 Feb 2022

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे भावूक, आंदोलनस्थळी वारकऱ्यांनी अभंग सादर केल्यानंतर त्यांचं कौतुक करताना अश्रू अनावर

संभाजीराजे भावूक झाले, काही वारकरी त्यांना पाठिंबा द्यायला आल्यानंतर काही अभंग वारकऱ्यांनी सादर केले. त्यांचं कौतुक करताना संभाजीराजे भावुक झाले. डोळ्यात अश्रू

11:48 AM (IST)  •  28 Feb 2022

Kolhapur News Updates : कोल्हापुरातील दसरा चौकात सकल मराठा समाजाकडून अचानक रास्ता रोको आंदोलन

Kolhapur News Updates : कोल्हापुरातील दसरा चौकात सकल मराठा समाजाकडून अचानक रास्ता रोको आंदोलन, पालकमंत्री सतेज पाटील आंदोलनस्थळी येणार आहेत, त्याआधी रास्ता रोको

10:51 AM (IST)  •  28 Feb 2022

20 जणांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी निघाले.. 

मुख्य समन्वयक वर्षा बंगल्यावर चर्चा करण्यासाठी निघाले आहेत. यामध्ये 18 समन्वयक आणि 2 विद्यार्थी असं 20 जणांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
Baramati Crime : संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
PHOTO: ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :29 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 29 September 2024MNS Candidate vs Devendra Fadnavis : फडणवीसांविरोधात राज ठाकरे देणार उमेदवार,कुणाच्या नावाची चर्चा?Uddhav Thackeray Nagpur Daura : उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा आज नागपूर दौऱ्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
Baramati Crime : संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
PHOTO: ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Embed widget